महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'व्हॅलेंटाईन्स डे वीक' सुरू असताना अजूनही सिंगल असलेले सेलेब्रिटी - व्हॅलेंटाईन्स डे वीक

Single Bollywood and South Stars : व्हॅलेंटाईन्स डेच्या वीकमध्ये काही हिंदी चित्रपटसृष्टीतील आणि दाक्षिणात्य सिने कलाकार सिंगल आहेत. या कलाकारांच्या यादीीत कार्तिक आर्यन ते किर्ती सुरेश पर्यंत मोठी नावं आहेत.

Single Bollywood and South Stars
सिंगल बॉलिवूड आणि साऊथ स्टार्स

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 12, 2024, 8:01 PM IST

मुंबई - Single Bollywood and South Stars : प्रेमाचा सीझन, व्हॅलेंटाईन्स डे आता सुरू आहे, आज 12 फेब्रुवारीला हग डे साजरा केला जात आहे. दरम्यान, आता हिंदी चित्रपटसृष्टीतील आणि साऊथ सिनेसृष्टीतील असे काही स्टार्स आहेत, जे अजूनही सिंगल आहेत. यात बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि साऊथ अभिनेत्री कीर्ती सुरेश यांच्या नावाचाही समावेश आहे. चला जाणून घेऊया या सिंगल स्टार्सबद्दल.

कार्तिक आर्यन आणि सारा अली खान : कार्तिक आर्यननं बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानला डेट केलं होतं. या दोघांनी 'लव्ह आज कल 2' हा चित्रपट एकत्र केला होता. यानंतर दोघेही प्रेमात पडले. मात्र यांच नात फार काळ टीकू शकला नाही. ब्रेकअपनंतर कार्तिक आणि सारा दोघेही सिंगल आहेत.

टायगर श्रॉफ :ॲक्शन हिरो टायगर श्रॉफ अभिनेत्री दिशा पटानीबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर सिंगल आहे. मात्र दिशा तिच्या परदेशी बॉयफ्रेंडला डेट करत आहे.

क्रिती सेनॉन :अभिनेत्री क्रिती सेनॉन अद्याप कोणत्याही अभिनेत्यासोबत अधिकृत रिलेशनशिपमध्ये नाही. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतबरोबर तिचं नाव जोडले गेले असले तरी ती आता देखील सिंगल आहे. सध्या रुपेरी पडद्यावर क्रितीचा रोमँटिक चित्रपट 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' प्रदर्शित झाला आहे.

पूजा हेगडे :साऊथ अभिनेत्री पूजा हेगडेचं रिलेशनशिप स्टेटस सिंगल आहे. 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटादरम्यान तिच नाव सलमान खानशी जोडलं गेलं होतं.

कीर्ती सुरेश : पूजा हेगडेबरोबर साऊथ सिनेसृष्टीत सक्रिय असलेली अभिनेत्री कीर्ती सुरेश देखील सिंगल आहे. ती तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

हुमा कुरेशी : हिंदी चित्रपटसृष्टीची 'महाराणी' हुमा कुरेशीलाही अद्याप जोडीदार मिळालेला नाही. हुमा बहुतेकदा तिच्या मित्रांसोबत पार्टी करताना दिसते.

श्रद्धा कपूर :हिंदी चित्रपटसृष्टीमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक असलेली श्रद्धा कपूर ही प्रेमाच्या या व्हॅलेंटाईन वीकमध्येही सिंगल आहे. फरहान अख्तरबरोबरच्या रिलेशनशिपमुळे तिचं नाव चर्चेत आलं होतं.

मृणाल ठाकूर :बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत सक्रिय असलेली अभिनेत्री मृणाल ठाकूरचं रिलेशनशिप स्टेटसही सिंगल आहे.

हेही वाचा :

  1. आलिया भट्टने शेअर केला शिकारीबद्दलचा जागरूकता व्हिडिओ, म्हणाली "शिकार हा खूनच"
  2. रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानीच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका व्हायरल
  3. साऊथ अभिनेता मामूट्टी स्टारर मल्याळम चित्रपट 'ब्रमायुगम'चा ट्रेलर प्रदर्शित

ABOUT THE AUTHOR

...view details