मुंबई - Upcoming Bollywood Movies and Web Series :आजपासून मे महिना सुरू होण्यास दोन दिवस शिल्लक आहेत. मे महिन्यात प्रदर्शित होणारे चित्रपट आणि वेब सीरीज कुठले आहेत, याबद्दलची माहिती आम्ही घेऊन आलो आहोत. तुमची उन्हाळी सुट्टी अधिक सुंदर बनविण्याचा आमचा प्रयत्न आहे. या कडक उन्हात तुम्ही कुठे जात नसाल तर तुम्ही या विशेष चित्रपट आणि वेब सीरिजचा आनंद घेऊ शकता.
हीरामंडी-द डायमंड बाजार : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची 'हीरामंडी-द डायमंड बाजार' वेब सीरीज सध्या खूप चर्चेत आहे. ही वेब सीरीज 1 मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रसारित होणार आहे. या सीरीजमध्ये बॉलिवूड अभिनेत्री मनीषा कोईराला, रिचा चढ्ढा, अदिती राव हैदरी संजीदा शेख, सोनाक्षी सिन्हा आणि शर्मीन सहगल यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
प्यार के दो नाम : लव्ह आणि रोमँटिक चित्रपटांच्या रसिकांसाठी 'प्यार के दो नाम' हा चित्रपट पाहण्यासाठी अगदी योग्य असणार आहे. हा चित्रपट 3 मे रोजी प्रदर्शित होत आहे. भव्या सचदेवा आणि अंकिता साहू स्टारर या चित्रपटाचे दिग्दर्शन दानिश जावेद यांनी केलंय.
टिप्सी : 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेता दीपक तिजोरी, अलंकृता सहाय, नताशा सुरी कैनत अरोरा, नाझिया हुसैन, सोनिया बिर्जे, हरजिंदर सिंग, मनदीप कौर संधू आणि दानिश भट्ट यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'टिप्सी' चित्रपटाचा ट्रेलर अलीकडेच प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन दीपक तिजोरी यांनी केलं असून हा चित्रपट 10 मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.