मुंबई- Janhvi Kapoor : अभिनेत्री जान्हवी कपूरची भूमिका असलेल्या आगामी 'उलझ' चित्रपटाचा टीझर बुधवारी प्रदर्शित झाला. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सुधांशू सारिया दिग्दर्शित या देशभक्तीपर थ्रिलरमध्ये जान्हवीबरोबर गुलशन देवैया आणि रोशन मॅथ्यू मुख्य भूमिका साकारत आहेत. हा चित्रपट एका सुप्रसिद्ध देशभक्त कुटुंबातील एका तरुण राजदूताभोवती केंद्रीत झाला आहे. अनेक रहस्यमय गोष्टी यातून उगडल्या जाणार आहेत.
जान्हवी कपूरनं तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर चित्रपटाचा टीझर शेअर करताना लिहिलंय: "लबाड, फसवणूक आणि विश्वासघाताच्या जगात प्रवेश करा. 'उलझ' 5 जुलै रोजी सिनेमागृहात." टीझर आपल्याला IFS (इंडियन फॉरेन सर्व्हिसेस) च्या मनोरंजक जगाच्या प्रवासावर घेऊन जातो. जान्हवीनं टीझर शेअर करताच तिच्या चाहत्यांनी आणि फिल्म इंडस्ट्रीतील शुभचिंतकांनी तिला या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
यामध्ये जान्हवी साकार करत असलेल्या सुहाना या व्यक्तीरेखेचा या मोहिमेतील हेतू सांगतानाच्या व्हाइस ओव्हरसह टीझरला सुरुवात होते, तेव्हापासून प्रेक्षकांचं लक्ष तिच्यावर खिळून राहते. तिच्याबाबतीत अनेक थ्रिलर गोष्टी घडताना यामध्ये दिसतात. हा एक वेगळ्या शैलीमध्ये सेट केलेला चित्रपट एका अनोख्या विश्वाचं दर्शन घडवणारा आहे.
'उलझ' या चित्रपटातून आपल्या देशाप्रती विश्वासघात आणि निष्ठा या जगाशी लवकरच आपली ओळख करून दिली जाईल, अशा नोकरीमध्ये सीमा कशा पुसट केल्या जातात यावरही चित्रपट प्रकाश टाकतो. विश्वासघाताची किंमत जीवन आहे असे सांगणारे जान्हवीचा विश्वासघाताबद्दलचा दमदार संवाद या टीझरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो.