मुंबई - Trisha Krishnan : अभिनेत्री तृषा कृष्णन अखेर साऊथ अभिनेता विजयबरोबर 'लिओ' चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. त्रिशा साऊथमधील प्रसिद्ध सेलिब्रिटींपैकी एक आहे. तिनं बॉलिवूडमध्येही काम केलंय. तिनं 2010 मध्ये 'खट्टा मीठा' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटामध्ये तिच्याबरोबर अक्षय कुमार हा मुख्य भूमिकेत दिसला होता. तब्बल 14 वर्षांनंतर ती सलमान खानबरोबर बॉलिवूडमध्ये स्क्रिन शेअर करणार आहे. या चित्रपटाचं नाव 'द बुल' असं आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन विष्णुवर्धन करणार आहेत. 'द बुल'मध्ये सलमान खान आणि त्रिशा कृष्णन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
त्रिशा कृष्णन 14 वर्षांनंतर सलमान खानबरोबर 'द बुल'मधून बॉलिवूडमध्ये करणार कमबॅक - Trisha Krishnan News - TRISHA KRISHNAN NEWS
Trisha Krishnan: साऊथ स्टार तृषा कृष्णन ही भारतीय चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध चेहरा आहे. तिनं खट्टा-मीठा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. 14 वर्षांनंतर त्रिशा आता पुन्हा एकदा सलमान खानसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.
Published : Jul 17, 2024, 5:35 PM IST
'द बुल' दिसणार साऊथ अभिनत्री या चित्रपटाची निर्मिती करण जोहर धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली होत आहे. रिपोर्ट्सनुसार, करण जोहर आणि सलमान खान 25 वर्षांनंतर एकत्र काम करणार आहेत. पुढच्या वर्षी ईदच्या मुहूर्तावर 'द बुल' चित्रपटगृहात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. हा चित्रपटात 3 नोव्हेंबर 1988 रोजी मालदीवमधील माले येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या दुःखद घटनेवर आधारित असणार आहे. या चित्रपटासाठी सलमान ६० दिवसांच्या ट्रान्सफॉर्मेशन फेजमधून जाणार आहे. एका जुन्या मुलाखतीत तृषा कृष्णननं बॉलिवूडच्या ऑफर्स न घेण्याचे कारण सांगत म्हटलं होत, "त्यावेळी, मी माझी जागा बदलून बॉम्बेला जायला तयार नव्हते, कारण त्यात खूप गोष्टी मागे राहिल्या असत्या आणि मला करिअरला पुन्हा नव्यानं सुरुवात करावी लागली असती."
वर्कफ्रंट : 'द बुल' हा चित्रपट हा खूप दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाच्या शुटिंगला लवकरच सुरूवात होणार आहे. आता सलमान आणि त्रिशाचे चाहते या चित्रपटाच्या रिलीजची खूप आतुरतेनं वाट पाहात आहेत. दरम्यान त्रिशा आणि सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तो शेवटी 'टायगर 3' या चित्रपटामध्ये दिसला होता. आता पुढं तो, 'पवन पुत्र भाईजान', 'नो एंट्री २', 'सिकंदर', 'किक 2', 'दबंग ४', 'इन्शाअल्लाह' आणि 'वांटेड 2'मध्ये दिसणार आहे. दुसरीकडे त्रिशाच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर 'गर्जनाई', 'मासानी अम्मन', 'विश्वंभरा', 'विदा मुयार्ची', 'द्वित्व', 'ठग लाइफ', 'राम' आणि 'सथुरंगा वेट्टाई - 2' या चित्रपटामध्ये झळकणार आहे.