महाराष्ट्र

maharashtra

यश स्टारर 'टॉक्सिक' चित्रपटात साई पल्लवी की करिना असणार नायिका? निर्मात्यांनी केला खुलासा - Toxic Movie

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 24, 2024, 12:36 PM IST

Toxic Movie: यश अभिनीत 'टॉक्सिक: ए फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स' चित्रपटाबद्दल एक अपडेट समोर आली आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी आता एक खुलासा केला आहे.

Toxic Movie
टॉक्सिक चित्रपट

मुंबई - Toxic Movie: केजीएफ फेम यश त्याच्या आगामी 'टॉक्सिक: ए फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स' चित्रपटामुळे चर्चेत आहे. दोन वर्षे झाली, पण यशचा अजून एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. आता यशचे चाहते त्याच्या 'टॉक्सिक' या चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहात आहेत. 'टॉक्सिक' चित्रपटाची घोषणा झाली . यानंतर, या चित्रपटामधील हिरोईनबद्दल बरीच चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली होती. या चित्रपटामध्ये करीना कपूर खान यशची हिरोईन होणार असल्याचं बोललं जात होतं. यानंतर श्रुती हासन आणि साई पल्लवी यांचीही नावे पुढे आली होती. आता 'टॉक्सिक' या चित्रपटाबाबत एक अपडेट समोर आली आहे.

'टॉक्सिक' चित्रपटाची अपडेट : या चित्रपटामध्ये करीना, श्रुती, साई यशबरोबर मुख्य भूमिकेत असणार असल्याच्या अफवा म्हटलं जात आहे. 'टॉक्सिक'च्या निर्मात्यांनी नायिकेच्या बाबतीत माहिती दिली. "टॉक्सिक: ए फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्सच्या कास्टिंगबद्दल अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. आम्ही 'टॉक्सिक' चित्रपटाबद्दल असणाऱ्या उत्साहाची खरोखर प्रशंसा करतो. मात्र काही अफवांवर विश्वास करणे टाळावे.'' या निवेदनात पुढं त्यांनी म्हटलं, ''टॉक्सिकसाठी यशची नायिका शोधण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे. कास्टिंग प्रक्रिया पूर्णत्वाकडे आली आहे. आम्ही आमच्या टीमसह या चित्रपटासाठी रोमांचित आहोत.''

यशची पोस्ट :टॉक्सिक चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेत्री आणि दिग्दर्शक गीतू मोहनदास करत आहेत. केव्हीएन ( KVN) प्रॉडक्शन आणि मॉन्स्टर माइंड क्रिएशन्सच्या बॅनरखाली बनलेला हा चित्रपट पुढच्या वर्षी 10 एप्रिलला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. याआधी यशनं एका इंस्टाग्राम व्हिडिओमध्ये चित्रपटाच्या शीर्षकाची घोषणा केली होती. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलं होत, "'तुम्ही जे शोधता, ते तुम्हाला शोधत आहे' - रुमी ए फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स टॉक्सिक." व्हिडिओमध्ये चित्रपटातील यशची झलक दाखविण्यात आली होती. या व्हिडिओत त्यानं टोपी घातलेली होती. त्याच्या तो़ंडात सिगार होती. हा चित्रपट ड्रगच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. या चित्रपटामध्ये यश ॲक्शन मोडमध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. अरहान खानचा नवीन पॉडकास्ट 'डंब बिर्याणी'मध्ये अरबाज आणि मलायका दिसणार, टीझर रिलीज - Arhaan Khan Podcast Dumb Biryani
  2. शहीद दिवसानिमित्त पाहता येतील असे अलीकडेच प्रदर्शित झालेले आणि आगामी देशभक्तीपर चित्रपट - Shaheed Diwas 2024
  3. "फुकट सल्ला देणे बंद" म्हणत, अनुराग कश्यपने केला दृढ संकल्प - ANURAG KASHYAP ON NEWCOMERS

ABOUT THE AUTHOR

...view details