मुंबई - Top ten Coming Soon Comedy Movie :बॉलिवूडमध्ये दरवर्षी प्रत्येक जॉनरचे लोकप्रिय अॅक्शन आणि कॉमेडी चित्रपट निर्माण होतात. अशा परिस्थितीत हिंदी फिल्म इंडस्ट्रीत 2024-25 मध्ये अनेक कॉमेडी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. आज ईटीव्ही भारतच्या या विशेष बातमीमध्ये आम्ही तुमच्यासाठी 10 आगामी मास कॉमेडी चित्रपटांबद्दल सांगणार आहोत. तुमच्या दैनंदिन तणावातून मुक्त होण्यासाठी हे मनोरंजक चित्रपट कधी प्रदर्शित होत आहेत यावर एक नजर टाकूया.
स्त्री 2
राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर स्टारर 'स्त्री' हा 2018 मध्ये प्रदर्शित झालेला हॉरर कॉमेडी चित्रपट विसरणं कठीण आहे. या चित्रपटातील संवाद आजही लोकांच्या ओठावर आहेत. आता अमर कौशिक दिग्दर्शित 'स्त्री 2' रिलीजसाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट 30 ऑगस्ट 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.
भुल भुलैया 3
'भुल भुलैया 2' नंतर कार्तिक आर्यन त्याच्या 'भुल भुलैया 3' या हॉरर कॉमेडी चित्रपटाचा तिसरा भाग घेऊन परतत आहे. यावेळी 'रुह बाबा'बरोबर तृप्ती दिमरी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अनीस बज्मी दिग्दर्शित 'भूल भुलैया 3' हा चित्रपट चालू वर्षीच्या दिवाळीला प्रदर्शित होणार आहे.
बॅड न्यूज
'गुड न्यूज'नंतर आता करण जोहर निर्मित 'बॅड न्यूज' हा विनोदी चित्रपट असणार आहे. विकी कौशल, पंजाबी अभिनेता एमी वर्क आणि तृप्ती दिमरी यात विनोदाची भर घालणार आहेत. हा चित्रपट आनंद तिवारी यांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट 19 जुलै 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.
हाउसफुल्ल ५
अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि अभिषेक बच्चन यांच्या भूमिका असलेला 'हाऊसफुल 5' या चित्रपटावर सध्या काम सुरू आहे. या चित्रपटात बॉबी देओलच्या एंट्रीचाही विचार केला जात आहे. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. तरूण मनसुखानी दिग्दर्शित साजिद नाडियादवालाच्या 'हाऊसफुल ५' या चित्रपटाचे शूटिंग ५ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.
वेलकम 3
निर्माता फिरोज नाडियाडवाला त्यांच्या 'वेलकम' फ्रँचायझीच्या पुढील साखळीत 'वेलकम टू द जंगल'च्या तिसऱ्या भागाची तयारी करत आहेत. 'वेलकम 3' हा एक मास कॉमेडी चित्रपट असणार आहे. यामध्ये अक्षय कुमार, सुनील शेट्टी, श्रेयस तळपदे, रवीना टंडन, जॅकलीन, लारा दत्त यांच्यासह २५ हून अधिक सेलिब्रिटींचा समावेश आहे. 'वेलकम 3' यंदाच्या ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.
विक्की विद्या का वो वाला वीडियो