मुंबई - गुलजार यांनी दिग्दर्शित केलेल्या 'आँधी' या चित्रपटानं भारतात वादळ निर्माण केलं होतं. १९७५ मध्ये प्रदर्शित झालेला कालातीत क्लासिक 'आँधी', राजकारणाच्या पार्श्वभूमीवर एक परिपक्व प्रेमकथा वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. रिलीज झाल्यानंतर (५० वर्षांपूर्वी १३ फेब्रुवारी रोजी), असं वाटलं की सुचित्रा सेन आणि संजीव कुमार अभिनीत चित्रपट तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटाच्या काही पोस्टर्समध्येही या समानतेला चालना देण्यात आली होती. इतकंच नाही तर दक्षिण भारतातील एका पोस्टरमध्ये 'तुमच्या पंतप्रधानांना पडद्यावर पहा' असाही लिहिलं होतं.
दिल्लीच्या एका दैनिकात प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीत 'स्वातंत्र्योत्तर भारतातील एका महान महिला राजकीय नेत्याची कहाणी' असं या चित्रपटाचं वर्णन करण्यात आलं होतं. तत्कालीन माहिती आणि प्रसारण मंत्री आय.के. गुजराल यांनी चित्रपट पाहण्यासाठी त्यांच्या कर्मचाऱ्यांना पाठवलं होतं असंही सांगण्यात येतं. हा चित्रपट सार्वजिनक प्रदर्शनासाठी योग्या आहे अथवा नाही याची शहानिशाही करण्यात आली होती. या चित्रपटातील पात्र आरती देवी आणि इंदिरा गांधी यांच्यात कोणतेही साम्य नाही असं दिग्दर्शक गुलजार यांनी ठामपणे सांगितलं होतं तरीही हा सिनेमा इंदिया रांधींवर आधारित असल्याची चर्चा सुरूच राहिली होती.
खरंतर आरती देवी आणि इंदिरा गांधी यांच्यात फार विचित्र स्वरुपाचं साम्य होतं. दोघींचे कपडे परिधान करण्याची पद्धत, साडी नेसण्याची पद्धत, केसांची पांढरी बट, शांत आणि दृढ निश्चयासह चालण्याची पद्धत याच्यात साम्य वाटत होतं. अखेर २० आठवड्यांहून अधिक काळ चित्रपट चांगला प्रदर्शित झाल्यानंतर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. आँधी चित्रपटाचं कथानक सुचित्रा सेन आणि संजीव कुमार या एका विभक्त जोडप्याभोवती फिरतं, जेव्हा राजकारणात असलेली पत्नी जेव्हा पतीनं चालवलेल्या हॉटेलमध्ये राहण्यासाठी येते.
"या चित्रपटाला वैध सेन्सॉरशिप प्रमाणपत्र मिळाले असतानाही आणि सिनेमा चित्रपटगृहांमध्ये २० आठवड्यांहून अधिक काळ चालत असतानाही बंदी घालण्यात आली होती हे मनोरंजक होतं. एवढंच नाही तर पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारनं २५ जून १९७५ रोजी अंतर्गत राष्ट्रीय आणीबाणी लागू केली होती आणि ती २१ महिने चालली होती, त्यामुळं मॉस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून चित्रपट मागं घ्यावा लागला होता. त्यानंतर चित्रपट मॉस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात घेऊन गेलेल्या गुलजार यांना प्रदर्शनापूर्वीच बंदीची बातमी मिळाली. त्यांना चित्रपटाचे प्रसिद्धी पोस्टर्स काढून टाकावेत आणि प्रिंट परत पाठवावेत अशीही माहिती देण्यात आली होती," असं प्रसिद्ध चित्रपट इतिहासकार अमृत गंगर यांनी आँधीच्या 50 वर्षांच्या निमित्तानं सांगितलं.
गुजरातमधील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान 'आरती देवी' धूम्रपान आणि मद्यपान करतानाचं दृश्य दाखवण्यास सुरुवात केली तेव्हा बंदी घालण्याचे प्रमुख कारण समोर आलं. चित्रपटाला गती मिळाल्यानं काही महत्त्वाकांक्षी प्रदर्शकांनी 'आँधीमध्ये इंदिरा गांधी पहा' या ओळीसह चित्रपटाचा प्रचारही सुरू केला. आतापर्यंत हा चित्रपट राजकारण्यांवर सौम्य व्यंगचित्र असूनही उघडपणे वादात सापडला होता. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर २६ आठवड्यांनी अखेर या चित्रपटावर बंदी घालण्यात आली. हा चित्रपट इंदिरा गांधीवर आधारित नाही याचा खुलासा प्रेक्षकांना व्हावा यासाठी गुलजार यांना 'आरती देवी' इंदिरा गांधींच्या फ्रेम केलेल्या फोटोकडे पाहत आहेत आणि श्रीमती गांधींप्रमाणे भारताची सेवा करू इच्छिते असं सांगणारा एक दृश्य समाविष्ट करावे लागलं होतं.
आणीबाणी उठल्यानंतर आणि जनता पक्षाचं नवं सरकार निवडून आल्यानंतर १९७७ मध्ये हा चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटाच्याभोवती असलेले वाद, त्याच्या कथानकातील मनोरंजक आणि भिन्न स्तर, उत्कृष्ट कामगिरी आणि अर्थातच, आर. डी. बर्मन यांचे संगीत आणि 'तेरे बिना जिंदगी से शिकवा', 'इस मोड से जाते हैं' आणि 'तुम आ गये हो' सारख्या गाण्यांचा चांगला संग्रह यामुळे चित्रपट लोकप्रियतेच्या कळसावर पोहोचला होता.
हेही वाचा -