महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

म्यूझिकल मालिका 'बंदिश बँडिट्स'चा दुसरा सिझन डिसेंबरमध्ये प्रवाहित होणार

'बंदिश बँडिट्स' या लोकप्रिय मालिकेचा दुसरा सिझन 13 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. यामध्ये ऋत्विक भौमिक आणि श्रेया चौधरी हे पुन्हा एकदा संगीतकारांच्या भूमिकेत परतणार आहेत.

'Bandish Bandits'
'बंदिश बँडिट्स'चा दुसरा सिझन (Bandish Bandits poster)

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 13, 2024, 3:58 PM IST

मुंबई - 'बंदिश बँडिट्स' या मालिकेचा दुसरा सिझन डिसेंबर महिन्यात प्राईम व्हिडिओवर प्रसारित होणार आहे. 2020 मध्ये पहिल्यांदा प्रसारित झालेल्या 'बंदिश बँडिट्स' म्यूझिकल रोमँटिक मालिकेनं प्रेक्षकांना मोहित केलं होतं. या मालिकेत नवोदित ऋत्विक भौमिक यानं राधेय राठोड, एक हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतकाराची भूमिका साकारली होती आणि श्रेया चौधरी हिनं संगीताच्या वेगळ्या जगातून आलेल्या तमन्ना शर्मा या पॉप गायिकेची भूमिके केली होती. आनंद तिवारी यांनी दिग्दर्शित केलेल्या या मालिकेची निर्मिती स्टिल अँड स्टिल मूव्हिंग पिक्चर्स यांनी केली होती. पहिल्या भागाला मिळालेल्या उत्तुंग यशानंतर 'बंदिश बँडिट्स' चा दुसरा भाग प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे.

'बंदिश बँडिट्स' म्युझिकल मालिका 13 डिसेंबर रोजी प्राईम व्हिडिओवर त्याच्या दुसऱ्या सीझनसह परत येईल, असे अमेझॉन प्राईम व्हिडिओ या स्ट्रीमिंग सेवेने बुधवारी जाहीर केलं. अमृतपाल सिंग बिंद्रा आणि आनंद तिवारी यांनी तयार केलेल्या या रोमँटिक ड्रामा शोमध्ये अभिनेता ऋत्विक भौमिक आणि श्रेया चौधरी हे पुन्हा एकदा राधे आणि तमन्ना या दोन संगीतकारांच्या भूमिकेत परतणार आहेत.

'बंदिश बँडिट्स' चा पहिला सीझन ऑगस्ट 2020 मध्ये रिलीज झाला होता. याध्ये ज्येष्ठ अभिनेता नसीरुद्दीन शाह देखील होते. सीझन 2 साठी पुनरागमन करणाऱ्या कलाकारामध्ये शीबा चड्ढा, अतुल कुलकर्णी, राजेश तैलंग आणि कुणाल रॉय कपूर यांचा समावेश आहे. त्यांच्याबरोबर दिव्या दत्ता, रोहन गुरबक्सानी, यशस्विनी दायमा, आलिया कुरेशी आणि सौरभ नय्यर हे नवोदित कलाकारही सामील झाले आहेत.

या मालिकच्या पहिल्या भागासा समीक्षक आणि प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. यातील कलाकारांच्या अभिनयाची, लेखन आणि दिग्दर्शनाची, गाणी आणि पार्श्वभूमीची प्रशंसा झाली होती. समीक्षकांनी २०२० मधील सर्वोत्कृष्ट मालिका म्हणून या मालिकेचा गौरव केला होता. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट मूळ कथा आणि सर्वोत्कृष्ट पटकथा यासह सात फिल्मफेअर ओटीटी पुरस्कारांसाठी या मालिकेला नामांकन मिळाले होते. या मालिकेचं मुख्य शूटिंग राजस्थानमधील जोधपूर आणि बिकानेर येथे झाले होते. चित्रपटाचा साउंडट्रॅक अल्बम आणि बॅकग्राउंड स्कोअर शंकर-एहसान-लॉय यांनी संगीतबद्ध केल्यामुळं त्याला एक वेगळा दर्जा प्राप्त झाला होता. प्राइम व्हिडिओ इंडियाचे ओरिजिनल्सचे प्रमुख निखिल मधोक यांनी विश्वास व्यक्त केला की, बंदिश बँडिट्सच्या दुसऱ्या सीझनला पहिल्या सीझनप्रमाणेच प्रेम आणि कौतुक मिळेल. 'बंदिश बँडिट्स' ही म्युझिकल मालिका 13 डिसेंबर रोजी प्राईम व्हिडिओवर प्रासिरत होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details