महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

पुष्कर जोग स्टारर 'धर्मा- दि एआय स्टोरी' चित्रपट होईल 'या' दिवशी रिलीज - Dharma the AI story movie - DHARMA THE AI STORY MOVIE

Dharma- The AI ​​Story : पुष्कर जोग अभिनीत 'धर्मा- दि एआय स्टोरी' हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. आता या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.

Dharma- The AI ​​Story
'धर्मा- दि एआय स्टोरी' (instagram)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 12, 2024, 6:41 PM IST

मुंबई - Dharma- The AI ​​Story : आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर भाष्य करणाऱ्या 'धर्मा- दि एआय स्टोरी' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सोशल मीडियावर जाहीर केली गेली आहे. हा चित्रपट येत्या 18 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित असलेल्या या पहिल्या मराठी चित्रपटाचं दिग्दर्शन पुष्कर जोग यान केलय. बी यु प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाच्या तेजल पिंपळे निर्मात्या आहेत. यात पुष्कर जोग, दीप्ती लेले आणि स्मिता गोंदकर या कलाकारांच्या प्रमुख भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. पुष्कर जोगनं मराठी सिनेसृष्टीला नेहमीच वेगळे चित्रपट दिले आहेत. त्याचा प्रत्येक चित्रपट खूप खास असतो. त्यामुळे या चित्रपटाही प्रेक्षकांना काहीतरी नवीन अनुभवायला मिळेल, हे नक्की!

पुष्कर जोग स्टारर 'धर्मा- दि एआय स्टोरी' होणार लवकरच प्रदर्शित : नुकत्याच रिलीज केलेल्या या पोस्टरमध्ये पुष्कर जोगच्या मागे काही कोड लँग्वेजमध्ये लिहिलेले आकडे, शब्द दिसत आहेत. त्यामुळे आता एआय टेक्नॉलॉजीचा वापर या चित्रपटात कसा होणार आहे, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या चित्रपटामध्ये आयटी क्षेत्राबद्दल खूप काही प्रेक्षकांना पाहायला मिळेल. या चित्रपटाच्या रिलीजसाठी आता पुष्करचे चाहते खूप उत्सुक आहेत. 'धर्मा- दि एआय स्टोरी' चित्रपटामध्ये पुष्करच्या चाहत्यांना त्याचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळेल.

पुष्कर जोगनं केलं भाष्य :चित्रपटाबद्दल दिग्दर्शक पुष्कर जोग म्हणतात. "धर्मा - दि एआय स्टोरी प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. हा एक वेगळा विषय असून एका वडिलांची आणि मुलीची ही गोष्ट आहे. एआय टेक्नॉलॉजीचा वापर करून वैयक्तिक सूड उगवण्याचा प्रयत्न करत एका निष्ठावंत बापाच्या मुलीचे अपहरण केले जाते. आपल्या मुलीला पुन्हा जिवंत पाहाण्यासाठी धर्म मुक्तीच्या धोकादायक प्रवासाला निघालेल्या या वडिलांची ही गोष्ट आहे. हॅालिवूडमध्ये ज्याप्रमाणे ॲक्शन सीक्वेन्स असतात, तसेच या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटातून एक नवा प्रयत्न करण्यात येत आहे."

ABOUT THE AUTHOR

...view details