महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

गोळीबार प्रकरणी सलमान आणि अरबाज खानचे पोलिसांनी नोंदवले जबाब - Salman Khans statement

Salman khan: सलमान आणि अरबाज खान बंधूंचे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं जबाब नोंदवले आहेत. याप्रकरणी कसून चौकशी सुरू झाली आहे.

Salman Khan's house firing case
सलमान खानच्या घरावरचे गोळीबार प्रकरण (सलमान खान (IANS))

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 12, 2024, 5:36 PM IST

Updated : Jun 12, 2024, 9:59 PM IST

मुंबई - Salman khan : बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील राहत्या घरावर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्या टोळीतील सागर पाल आणि विकी गुप्ता या दोघांनी गोळीबार केला होता. ही घटना 14 एप्रिल रोजी पहाटे घडली होती. या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं आतापर्यंत सहा आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. दरम्यान, या प्रकरणात 4 जून रोजी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अभिनेता सलमान खान आणि त्याचा भाऊ अरबाज खान या दोघांचे जबाब नोंदवले, असल्याची माहिती पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिली आहे.

१४ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजताच्या सुमारास अभिनेता सलमान खान यांच्या वांद्रे येथील गॅलॅक्सी अपार्टमेंटमधील घरावर आरोपी सागर पाल आणि विक्की गुप्ता यांनी गोळीबार केला होता. नंतर १६ एप्रिलला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुजरात राज्यातील कच्छ येथील एका मंदिरातून या दोन आरोपींना अटक केली होती. त्यानंतर दीड महिन्यांनी अभिनेता सलमान खान आणि त्याचा भाऊ अरबाज खानचा जबाब गुन्हे शाखेने नोंदवला आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिली आहे. यासाठी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यासह चार जणांचे पथक सलमानच्या घरी जबाब नोंदवण्यासाठी दुपारी १२ वाजताच्या सुमारास गेले होते. सलमान खानचे साडेतीन ते चार तास तर अरबाज खानचा २ तास जबाब नोंदवण्यात आला. सायंकाळी ५.३० नंतर गुन्हे शाखेचे पथक सलमानच्या घरून निघाले होते.

अरबाज खानचा चार पानांचा जबाब तर सलमान खानचा ९ पानांचा जबाब नोंदवण्यात आला असून सलमानने अतिशय गंभीर घटना असल्याचं जबाबात म्हटलं आहे. अभिनेता सलमान खानला आता वाय प्लस एस्कॉर्ट सुरक्षा मुंबई पोलिसांकडून पुरवली जात आहे. १४ एप्रिलला ज्यावेळी सलमान खानच्या राहत्या घरावर गोळीबार झाला. त्याआधी सलमान खानच्या घरी एक पार्टी आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर सलमान उशिरा झोपला होता आणि अचानक पहाटे गोळीबाराचा आवाज ऐकून त्याला जाग आली. ही घटना अतिशय गंभीर असून मुंबई पोलिसांनी चांगली कामगिरी केली असल्याचं त्याने जबाबात म्हटलय.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकानं जवळपास १५० प्रश्न अभिनेता सलमान खान आणि त्याचा भाऊ अरबाज खानला विचारले. १४ एप्रिलला जेव्हा गोळीबाराची घटना घडली तेव्हा अभिनेता अरबाज खान हा घटनास्थळी उपस्थित नव्हता. तेव्हा अरबाज जुहूतील त्याच्या घरी होता. मात्र, अगोदर घडलेल्या सलमानसोबतच्या घटनांवेळी अरबाज त्याच्यासोबत असल्याने त्याचा जबाब नोंदवण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण २९ जणांचे जबाब सलमान खान गोळीबार प्रकरणात नोंदवण्यात आलेले आहे. गोळीबाराची घटना घडली होती. तेव्हा सलमान खानचे वडील सलीम खान घरी उपस्थित होते. मात्र, त्यांचे वय पाहता त्यांचा जबाब नोंदवण्यात आलेला नाही. गरज पडल्यास त्यांचा जबाब नोंदवू अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. तसंच सलमान गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी लॉरेन्स बिष्णोई याला लवकरच मुंबई पोलीस साबरमती तुरुंगातून ताब्यात घेण्यासाठी कागदोपत्री प्रक्रिया सुरु करणार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली असून कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी लॉरेन्स बिश्नोईला मुंबई पोलीस सलमान खान गोळीबार प्रकरणात ताब्यात घेणार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याकडून मिळाली आहे.

हेही वाचा :

  1. आमिरचा मुलगा जुनैद खानच्या चित्रपटाला हिंदू संघटनांचा विरोध, ट्रेलर-प्रमोशनशिवाय 'महाराज' होणार थेट रिलीज - Maharaj release
  2. आलिया भट्टनंतर 'लाफ्टर क्वीन' भारती सिंगनं लावला कानामागे काळा टिळा - BHARATI SINGH
  3. गायिका पलक मुच्छलनं हृदयविकाराचा सामना करणाऱ्या तीन हजार मुलांचे वाचवले प्राण - SINGER PALAK MUCHHAL
Last Updated : Jun 12, 2024, 9:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details