मुंबई- Kalki 2898 AD team Italy Diaries : 'सालार'च्या पहिल्या भागानंतर 'बाहुबली' स्टार प्रभासचे चाहते त्याच्या आगामी दोन महत्त्वकांक्षी चित्रपटांची प्रतीक्षा करत आहेत. 'सालार भाग २: शौर्यंगा पर्वम' आणि 'कल्की २८९८ एडी' हे दोन चित्रपट प्रदर्शनासाठी तयार होत आहेत. नाग अश्विन दिग्दर्शित 'कल्की २८९८ एडी' चे शूटिंग शेड्यूल इटलीमध्ये होणार आहे. यासाठी संपूर्ण क्रू आणि कलाकार यासाठी बुधवारी रवना झालेत. चित्रपटाच्या टीमने अपडेट शेअर करताना आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर दिशा पटानी आणि प्रभासचे खासगी विमानातून प्रवास करतानाचे फोटो शेअर केले आहेत.
नाग अश्विनचा 'कल्की 2898 एडी' या चित्रपटाकडून चाहत्यांना खूप जास्त अपेक्षा आहेत. या सायन्स फिक्शनच्या निर्मात्यांनी आता शूटिंगचे अपडेट देताना इटली डायरीतील डार्लिंग प्रभासचा आणि दिशा पटानीचा फोटो शेअर केला आहे. ( चाहते प्रभासला आवडीने डार्लिंग असे म्हणतात )
फोटोत दिशा काळ्या रंगाची हुडी परिधान करून प्रभासचा फोटो क्लिक करताना असून तिचा चेहरा यामध्ये अस्पष्ट दिसत आहे. प्रभास वळून दिशाकडे फोटोसाठी पोज देताना दिसत आहे. प्रभासने ग्रे कलरचा टी-शर्ट आणि काळी टोपी आणि तपकिरी गॉगल घातलेला दिसत आहे.