मुंबई - The Great Indian Kapil Show : कॉमेडी किंग कपिल शर्मा त्याच्या नवीन कॉमेडी शो 'द ग्रेट इंडियन कपिल'मुळे सध्या खूप चर्चेत आहे. त्याच्या या शोच्या पुढील एपिसोडमध्ये प्रसिद्ध रॅपर बादशाह, करण औजला आणि डिव्हाईन दिसणार आहेत. 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा नवीन प्रोमो आज 12 जून रोजी प्रदर्शित करण्यात आला. यामध्ये कपिल रॅपर युनियनबरोबर खूप मस्ती करताना दिसत आहे. 'द ग्रेट इंडियन कपिल'चा व्हायरल होत असलेला प्रोमो आता अनेकांना आवडत आहे. या प्रोमोच्या पोस्टमध्ये अनेकजण कमेंट करून हा एपिसोड नक्की पाहणार असल्याचं म्हणताना दिसत आहेत.
'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा नवीन प्रोमो रिलीज :कपिल शर्मानं प्रोमोमध्ये रॅपर डिव्हाईनवर खिल्ली उडवताना म्हटलं, "गुन्हेगार, गली गँग, पाप पुण्य इत्यादी शीर्षक तुझ्या रॅपचे आहे, तुम्ही लेखकाला तिहार तुरुंगातून कामावर घेतले आहे का?" कपिलच्या या विधानावर तिथे उपस्थित असलेले सर्वजण हसू लागले. यानंतर कपिल शर्मानं बादशाहला विचारलं, "पाजी, तुम्हाला फॅनमुळे कधी काही त्रास झाला का ?" यावर बादशाहनं सांगितले की, "माझी एका चाहत्याबरोबर वॉशरूममध्ये भेट झाली होती, यावेळी त्यानं मला सेल्फी मागितली होती." बादशाहच्या या खुलाशानंतर सर्वजण पुन्हा एकदा हसू लागले. 'ओ सजना' या गाण्यासाठी बादशाहनं डिव्हाईन आणि निकिता गांधीबरोबर काम केलंय.