महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

नेटफ्लिक्सवर सुरू होणार जीवघेणा मृत्यूचा खेळ, 'स्क्विड गेम सीझन 2' चा धडकी भरवणारा ट्रेलर प्रदर्शित - SQUID GAME SEASON 2 TRAILER

'स्क्विड गेम सीझन 2' चा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. नव्या स्टार्सनी या सीझनमध्ये प्रवेश केला असून यात पुन्हा एकदा मृत्यूचा थरारक खेळ पाहायला मिळेल.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 27, 2024, 12:19 PM IST

मुंबई - 'स्क्विड गेम' या कोरियन थरारक वेब सिरीजचा दुसरा सीझन सुरू होणार असून याचा ट्रेलर आज 27 नोव्हेंबर रोजी रिलीज झाला आहे. 'स्क्विड गेम'च्या सीझन 1 नं जगभरात खळबळ माजवल्यानंतर आता निर्मात्यांनी 'स्क्विड गेम सीझन 2' च्या घोषणेसह जगभरातील प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मृत्यूच्या खेळाचा गुंता वाढवणाऱ्या 'स्क्विड गेमचा सीझन २' किती धोकादायक असेल याचा पुरावा हा ट्रेलर देत आहे. हा सीझन आणखी धोकादायक, भयानक आणि भीतीदायक असणार आहे याची खात्री या ट्रेलरमुळं मिळत आहे. त्याच वेळी, 456 खेळाडूंनी 'स्क्विड गेम सीझन 2' मध्ये 456 खेळाडू पुन्हा प्रवेश करत आहेत, परंतु यावेळी गेम उलट होणार आहे.

अभिनेता ली जंग जे यानं या मालिकेत प्रवेश केला असून प्रत्येक खेळाडूचा स्वतःचा खेळ असेल. एक पूर्वीचं जोडपं, आई-मुलाची जोडी, महिला असल्याचे भासवणारे पुरुष आणि इतर अनेक मनोरंजक पात्र या गेममध्ये पाहायला मिळणार आहेत. 'स्क्विड गेम सीझन 2' चे निर्माते नेटफ्लिक्सनं आज मालिकेचा थरारक ट्रेलर रिलीज केला. अनेक कोरियन स्टार्स या मालिकेत दाखल झाले आहेत. या मालिकेचे आतापर्यंत दोन टीझर रिलीज झाले होते आणि प्रेक्षक ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत होते. ट्रेलरमध्ये टिझरपेक्षा काही खास नसलं तरी नवीन स्टारकास्टचे चेहरे समोर आले आहेत.

स्क्विड गेम सीझन 2 कास्ट

अभिनेता ली जंग जे व्यतिरिक्त, ली ब्यूंग हून, वेइ हा ज्यूं, आणि गाँग यो यांच्या भूमिका स्क्विड गेम सीझन 2 मध्ये वाढवल्या गेल्या आहेत. दरम्यान, नवीन स्टार कास्टमध्ये यिम सी-वोन, कांग हा न्युल, पार्क ग्यु यंग, ​​ली जिन युक, पार्क सुंग हून, यंग डोंग ग्युन, कांग ए सिम, ली डेव्हिड, चोई सेंग ह्यून, रोह जे वोन, जो यू री आणि वोन जी या लोकप्रिय कोरियन कलाकारांची मांदियाळी यात पाहायला मिळेल.

'स्क्विड गेम' मालिकेचा पहिला सीझन नेटफ्लिक्सवर 2021 मध्ये स्ट्रीम झाला होता. पहिला हंगाम जागतिक पातळीवर हिट ठरला. पहिल्या सीझनचा शेवट सेओंग जी हून च्या जिंकण्यानं झाला. आता तीन वर्षांनी तो पुन्हा परतत आहे. आपल्या सहकारी खेळाडूंच्या हत्येचा बदला घेणं आणि मनोरंजनासाठी खेळलेला त्यांचा हा स्वार्थी खेळ उघड करणं हे त्याचे उद्दिष्ट आहे. 'स्क्विड गेम'चे आणखी दोन सीझन असतील. सीझन 2 चा प्रीमियर 26 डिसेंबर 2024 रोजी होईल आणि त्यानंतर 2025 मध्ये अंतिम सीझन होईल. या शोचे दोन्ही सीझन एकाच वेळी शूट करण्यात आल्याची माहिती आहे.

हेही वाचा -

  1. प्रेक्षकांना हादरवून सोडणाऱ्या 'स्क्विड गेम' वेब सिरीजच्या दुसऱ्या सीझनचा टिझर लॉन्च
  2. स्क्विड गेम अभिनेता ली जंग जे यांने मानले नेटफ्लिक्ससह दिग्दर्शकाचे आभार

ABOUT THE AUTHOR

...view details