मुंबई - GOAT Movie : थलपथी विजयचा आगामी चित्रपट 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम' थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. काही दिवसांपूर्वी निर्मात्यांनी चित्रपटाचं आगाऊ बुकिंग जाहीर केलं होतं. आता निर्मात्यांनी या चित्रपटाबाबत एक नवीन अपडेट शेअर केली आहे. निर्मात्यांनी चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम'चं स्पेशल स्क्रीनिंग देशात नाही तर परदेशात होणार आहे. 31 जुलैच्या संध्याकाळी 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम'च्या स्पेशल स्क्रीनिंगशी संबंधित एक बातमी समोर आली होती. चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर करताना निर्मात्यांनी सांगितलं की, "यू.के. कुटुंबीय, 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम'ची तिकिटे मिळवणारे तुम्ही पहिले आहात. थलपथी विजय यूकेच्या द लाईट थिएटरमध्ये पडद्यावर चमकण्यासाठी दिवस मोजत आहेत. आत्ताच तुमच्या जागा बुक करा." थलपथी विजयचा हा चित्रपट खूप दिवसांपासून चर्चेत आहे.
'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम'मध्ये विजय दिसणार दुहेरी भूमिकेत : निर्मात्यांनी थलपथीच्या वाढदिवसानिमित्त 22 जून रोजी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला होता. समोर आलेल्या टीझरमध्ये थलपथी विजय हा दुहेरी भूमिकेत दिसला होता. निर्मात्यांच्या या सरप्राईजमुळे विजयच्या चाहत्यांमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत उत्सुकता वाढली होती. व्यंकट प्रभू दिग्दर्शित 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम' हा चित्रपट 5 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर तेलुगू व्यतिरिकेत हिंदी भाषेतही रिलीज होईल. थलपथी विजय या चित्रपटामध्ये अभिनेता-कोरियोग्राफर प्रभू देवा, प्रशांत, मोहन, जयराम, स्नेहा, लैला, अजमल अमीर, मीनाक्षी चौधरी, योगी बाबू आणि वैभव यांच्याबरोबर दिसणार आहे.