मुंबई: Most popular star in India : ऑर्मैक्स मीडियानं ऑगस्ट 2024साठी भारतातील सर्वाधिक लोकप्रिय स्टारची यादी जाहिर केली आहे. यावेळी साऊथ स्टार्सनं सर्वाधिक लोकप्रिय, स्टार्सच्या यादीत अव्वल स्थान पटकावलं आहे. याआधी आलिया भट्टनं फीमेल स्टार म्हणून सर्वांना पराभूत केलं होतं. याशिवाय प्रभास हा लोकप्रिय मेल स्टार म्हणून अव्वल होता. आता ऑगस्टच्या यादीत खूप काही बदल पाहायला मिळत आहेत. शाहरुख खान, सलमान, आलिया आणि प्रभास या यादीत मागे असलेले स्टार्स आहेत.
सर्वात लोकप्रिय मेल स्टार
1. थलपथी विजय
2. प्रभास
3. शाहरुख खान
4. ज्युनियर एनटीआर
5. महेश बाबू
6. अजित कुमार
7. अल्लू अर्जुन
8. अक्षय कुमार
9. राम चरण
10. सलमान खान
थलपथी विजयचा चित्रपट :थलपथी विजयचा आजकाल 'गोट' चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. हा चित्रपट 5 सप्टेंबर रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला होता. आजही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. विजय शेवटी 'थलपथी 69' (शीर्षकहीन) चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटानंतर विजय राजकारणात सक्रिय होईल.
सर्वाधिक लोकप्रिय फेमल स्टार
1. सामंथा रुथ प्रभू
2. आलिया भट्ट
3. दीपिका पदुकोण
4. नयनतारा
5. काजल अग्रवाल
6. श्रद्धा कपूर
7. त्रिशा कृष्णन
8. कतरिना कैफ
9. रश्मिका मंदान्ना
10. कियारा अडवाणी
समांथा रुथ प्रभूचं वर्कफ्रंट : साऊथ अभिनेत्री समांथा रुथ प्रभू 'पुष्पा' चित्रपटातील 'ऊं अंटावा' या आयटम साँगनं प्रसिद्ध झाली आहे. यानंतर समांथा बॉलिवूड आणि साऊथच्या अनेक प्रोजेक्टमध्ये दिसली आहेत. समांथाचं मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी तिनं चित्रपटांमधून एक वर्षाचा ब्रेकही घेतला. आता ती बॉलिवूड अभिनेता वरुण धवनबरोबर 'सिटाडेल: हनी-बनी' या वेब सीरीजमुळे चर्चेत आहे. ही वेब सीरीज नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. आता अनेकजण या वेब सीरीजच्या रिलीजची वाट पाहात आहेत. यामध्ये ती वरुण धवनबरोबर अॅक्शन करताना दिसणार आहे. सध्या ही वेब सीरीज खूप चर्चेत आहे. 'सिटाडेल: हनी-बनी' वेब सीरीज प्रियांका चोप्राच्या 'सिटाडेल'चं भारतीय रुपांतर आहे.