महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'तेरी बातों में ऐसा उलझा जिया'नं बॉक्स ऑफिसवर केला 100 कोटींचा आकडा पार - तेरी बातों में ऐसा उलझा जिया

TBMAUJ Box office collection day 10 : शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉन अभिनीत 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया'नं बॉक्स ऑफिसवर 100 कोटीचा आकडा पार केला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

TBMAUJ Box office collection day 10
तेरी बातों में ऐसा उलझा जिया बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 10

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 19, 2024, 2:50 PM IST

मुंबई - TBMAUJ Box office collection day 10 : अभिनेता शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉन स्टारर लव्ह-रोमँटिक रोबोटिक चित्रपट 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया'नं 10 दिवसात जगभरात 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश केला आहे. शाहिद आणि क्रितीचा हा चित्रपट व्हॅलेंटाईन्स डे वीकमध्ये 9 फेब्रुवारी रोजी चॉकलेट डेला रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळत आहे. 2024 मध्ये रिलीज झालेला 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' हा 'फायटर'नंतरचा दुसरा चित्रपट आहे, ज्यानं 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश केला आहे. शाहिद आणि क्रितीच्या जोडीनं चाहत्यांची मनं जिंकली आहेत. या चित्रपटामधील 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' हे गाणं देखील खूप हिट झालं आहे.

'तेरी बातों में ऐसा उलझा जिया'ची एकूण कमाई :सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया'नं भारतीय बॉक्स ऑफिसवर 10 दिवसांत 58.2 कोटींची एकूण कमाई केली आहे. याशिवाय या चित्रपटानं जगभरात 107.86 कोटींचा गल्ला जमवला आहे. 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' चित्रपटानं 9 दिवसात जगभरात 98 कोटींची कमाई केली होती आणि आता रिलीजच्या 10 व्या दिवशी जगभरात 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया'नं 9 कोटी रुपये कमवून 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश केला आहे. शाहिद कपूरच्या करिअरमधील 100 कोटी पार करणारा हा चौथा चित्रपट ठरला आहे. यापूर्वी शाहिद कपूरच्या 'कबीर सिंग' (2019)नं बॉक्स ऑफिसवर 100 कोटींहून अधिक कमाई केली होती.

शाहिद कपूर 100 कोटी पार करणारे चित्रपट

कबीर सिंग ( 278.24 कोटी , जगभरात)

पद्मावत (302.15 कोटी, जगभरात )

आर. राजकुमार ( 101.21 कोटी, जगभरात) (66.1 कोटी देशांतर्गत )

क्रिती सेनॉनचे 100 कोटी पार करणारे चित्रपट

आदिपुरुष- (353 कोटी)

हाउसफुल 4 - ( 294.80 कोटी जगभरात) ( 246.52, देशांतर्गत )

दिलवाले 148.72 (जगभरात 376.85 कोटी)

लुका छिपी (111.87जगभरात ) (देशांतर्गत, 94 कोटी)

हेही वाचा :

  1. विलासराव देशमुख यांनी काँग्रेस सोडली होती?, सोशल मीडियावरील चर्चांना रितेश देशमुखचा एकाच वाक्यात रिप्लाय
  2. विमानाचे अपहरण करण्यांना धूळ चारण्यासाठी सिद्धार्थ मल्होत्रा सज्ज, योद्धाचा टीझर रिलीज
  3. प्रेग्नंसीच्या घोषणेनंतर वरुण धवन आणि नताशा सुट्टीसाठी रवाना

ABOUT THE AUTHOR

...view details