मुंबई - Phir Aayi Haseen Dillruba :अभिनेत्री तापसी पन्नू आणि विक्रांत मॅसी स्टारर 'हसीन दिलरुबा' 2021 मध्ये रिलीज झाला होता. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. या चित्रपटाला समीक्षकांकडून देखील सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. आता 3 वर्षानंतर 'हसीन दिलरुबा'चा सीक्वेल 'फिर आयी हसीन दिलरुबा' 9 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. दरम्यान तापसीनं तिच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. अलीकडेच तिनं 'हसीन दिलरुबा 3'ची हिंट दिली आहे. यानंतर तिचे चाहते देखील खुश आहेत.
'हसीन दिलरुबा' तापसीनं दिला इशारा : 'फिर आयी हसीन दिलरुबा' हा तापसी आणि कनिका ढिल्लनचा पाचवा सहयोग चित्रपट आहे. याआधी त्यांनी 'मनमर्जियां', 'हसीन दिलरुबा', 'रश्मि रॉकेट' आणि 'डंकी'मध्ये एकत्र काम केलं आहे. कनिकाबद्दल तापसीनं एका संवादादरम्यान म्हटलं, "फक्त कनिकाच मला अशी ग्रे कॅरेक्टर करायला लावू शकते. तिच्या कहाणीत लीड एक्ट्रेस या चुका करतात आणि त्या स्वीकारतात. ही एक खास गोष्ट आहे. खरं सांगायचं झालं तर लेखक-अभिनेत्री म्हणून आम्ही दोघेही एकमेकांना खूप चांगल्या पद्धतीनं समजतो." जेव्हा तापसीला विचारण्यात आलं की, 'हसीन दिलरुबा'चा तिसरा पार्ट सुद्धा येत आहे का ? तेव्हा तिनं उत्तर दिलं, "मी विक्रांत आणि सनी सारखे वाचन करत नाही, मात्र मी कनिकाला तिचा तिसरा भाग बनवण्यासाठी नक्कीच पुस्तक देईन."