महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

इंजिनीअरिंग सुरू असताना मॉडेलिंग करण्याचा केला निर्णय, आता बनली बॉलिवूडची 'हसीन दिलरुबा' - taapsee pannu - TAAPSEE PANNU

Taapsee Pannu Birthday: तापसी पन्नूचा आज 1 ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे. हा दिवस तिच्यासाठी खूप विशेष आहे. आज तिच्या वाढदिवसानिमित्त काही रंजक गोष्टी जाणून घ्या...

Taapsee Pannu Birthday
तापसी पन्नूचा वाढदिवस (Taapsee Pannu - instagram)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 1, 2024, 10:38 AM IST

मुंबई - Taapsee Pannu Birthday:बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू 1 ऑगस्ट रोजी तिचा 37वा वाढदिवस साजरा करत आहे. तापसीनं तिच्या अभिनयाच्या जोरावर साऊथ आणि बॉलिवूडमध्ये स्वतःचे नाव कमावले आहे. तिनं चित्रपट कारकिर्दीत आतापर्यंत अनेक प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत प्रमाणेच तापसी देखील तिच्या स्पष्टवक्ते शैलीसाठी ओळखली जाते. अनेकदा ती आपले मत सोशल मीडियावर बेधडक मांडताना दिसते. तिनं माजी बॅडमिंटनपटू मॅथियास बो यांच्याशी लग्न गुपचूप केल्यानंतर ती खूप चर्चेत आली होती. आता तापसी ही आगामी 'फिर आयी हसीन दिलरुबा' या चित्रपटातून खळबळ माजवण्यासाठी सज्ज झाली आहे.

तापसी पन्नूबद्दल... :तापसीचं बालपणीचं नाव 'मॅगी' आहे, कारण तिचे केस लहानपणापासूनच कुरळे आहेत. तापसीला बारावीत 90 टक्के गुण मिळाले होते. त्यानंतर तिनं कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनीअरिंग केलं. तापसी ही मूळची दिल्लीची असून तिनं गुरु तेग बहादूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतलं. इंजिनीअरिंग करत असताना तिनं मॉडेलिंग करण्याचा निर्णय पक्का केला. 2008 मध्ये, तापसीनं चॅनल व्ही (V)च्या टॅलेंट हंट शो गॉर्जियसमध्ये ऑडिशन देखील दिलं होतं. या शोमध्ये तिची निवड झाली. 2008 मध्ये तापसी पन्नूनं मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला होता. तिनं 2 वर्षांच्या मॉडेलिंगमध्ये अनेक जाहिरातींमध्ये काम केलं होतं.

तापसीची चित्रपट कारकीर्द : मॉडेलिंगदरम्यान तापसीनं बॉलिवूडमध्ये नाही तर थेट साऊथ फिल्म इंडस्ट्रीत आपलं नशीब आजमावलं. 2010 मध्ये 'झुम्मंडी नादम' या तेलुगू चित्रपटातून तिनं डेब्यू केला. तापसीनं हिंदी, तेलुगू, तामिळ आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केलंय. तिनं 2013 मध्ये 'चश्मेबद्दूर' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटामध्ये तिच्याबरोबर पाकिस्तानी अभिनेता आणि गायक अली जफर, साऊथ अभिनेता सिद्धार्थ आणि दिव्येंदू शर्मा दिसले होते. याआधी तिनं 3 वर्षात साऊथ चित्रपटसृष्टीत 10हून अधिक चित्रपट केले होते. तापसीनं तिच्या 14 वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये आतापर्यंत 44 चित्रपटात काम केलंय. या ऑगस्ट महिन्यामध्ये तिचे दोन चित्रपट दाखल होणार आहे. 'फिर आयी हसीन दिलरुबा' हा चित्रपट 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. तसेत तिचा 'खेल-खेल में' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 15 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये तिच्याबरोबर अक्षय कुमार, वाणी कपूर, फरदीन खान, एमी वर्क आणि आदित्य सील दिसणार आहेत. याशिवाय ती 'वो लडकी है कहाँ'मध्ये असणार आहे.

हेही वाचा :

  1. 'सांड की आँख'ची अभिनेत्री पतीससह पोहोचली पॅरिसला, ऑलिम्पिकरता दाखविला उत्साह - Taapsee Pannu
  2. तापसी पन्नू ,विक्रांत मॅसी आणि सनी कौशल स्टारर 'फिर आयी हसीन दिलरुबा'चा ट्रेलर रिलीज, पाहा व्हिडिओ - PHIR AAYI HASSEEN DILLRUBA
  3. 'फिर आयी हसीन दिलरुबा'चा ट्रेलर होईल उद्या प्रदर्शित, पोस्ट व्हायरल - PHIR AAYI HASSEEN DILLRUBA Movie

ABOUT THE AUTHOR

...view details