मुंबई - Nick Jonas 'Jiju':'नॅशनल जीजू' निक जोनसचे शनिवारी लोल्लापलूझा मुंबई कॉन्सर्टमध्ये भारतीय चाहत्यांनी जोरदार स्वागत केले आहेत. 27 जानेवारी शनिवारी जोनस ब्रदर्स एका मंचावर एकत्र आले होते. या कार्यक्रम दरम्यान जोनस ब्रदर्सनं आपलं एक हिट गाणं सादर केलं. केविननं निकची प्रेक्षकांसमोर 'जीजू' म्हणून ओळख करून दिली. त्यानंतर कॉन्सर्टमध्ये पोहोचलेल्या लोकांनी 'जीजू जीजू' म्हणून त्याला प्रोत्साहित केले. यावर निकनं सर्वांना 'लव्ह यू ऑल' म्हटलं. त्याच्या कॉन्सर्टमधील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओवर यूजर्स कमेंट्स करून त्याचे कौतुक करत आहेत.
जोनस ब्रदर्सच्या कॉन्सर्टमध्ये तापसी हजर : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूही निक जोनसच्या कॉन्सर्टमध्ये हजर होती. तिनं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर कॉन्सर्टचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'जीजाजी स्टेजवर आहेत.' निकनं आपल्या मुंबई कॉन्सर्टची सुरुवात मजेशीर पद्धतीने केली. 2018 मध्ये प्रियांकासोबतच्या लग्नाच्या जुन्या आठवणींना उजाळा देताना त्यानं म्हटलं, 'भारतातील हा माझा पहिलाच परफॉर्मन्स आहे.'' तेव्हा प्रेक्षकांनी 'जीजू, जीजू' म्हणायला सुरुवात केली. तेव्हा निकनं म्हटलं, "माझा या देशाशी खूप चांगले संबंध आहेत.आमच्यासोबत असल्याबद्दल धन्यवाद. आम्ही तुमची रात्र अधिक मनोरंजक करू." या कार्यक्रमात अनेकजण निकच्या परफॉर्मेंससाठी खूप आतुर होते.