मुंबई - बॉलिवूड स्टार सनी देओलनं 15 जानेवीर रोजी लष्कर दिन साजरा केला आणि भारतीय सैन्याच्या शैर्याला. धैर्याला, त्यागाला आणि समर्पणाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. लष्कार दिनाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या सैन्याच्या कार्यक्रमात सनीनं भाग घेतला. आपला वेळ सैनिकांबरोबर घालवताना त्यानं देशाच्या रक्षकांच्या शौर्याला सलाम केला. सनी देओलनं इंस्टाग्रामवर त्यांच्या भेटीचे अनेक व्हिडिओ आणि फोटो शेअर केलो आहेत. एका व्हिडिओमध्ये, सनी आणि सैनिक "भारत माता की जय" अशा घोषणा देताना दिसतात.
इतर काही फोटोत तो सैनिकांच्या बरोबर संवाद साधताना, त्याच्याशी मजा मस्ती करताना दिसत आहे. या भेटीत त्यानं जवानांबरोबर फोटो काढले आणि कुस्तीही खेळली. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलं, "तेव्हा, आता आणि कायमचे. आपल्या वीरांच्या धैर्याला, त्यागाला आणि अढळ समर्पणाला सलाम. भारतीय सैन्य दिनाच्या शुभेच्छा! हिंदुस्तान जिंदाबाद."