महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

"जैसा नाम, वैसा काम", म्हणत सुनिल शेट्टीने केलं यशस्वी जयस्वालचे कौतुक

भारतीय क्रिकेट संघाचा जिगरबाज खेळाडू यशस्वी जयस्वालने कसोटी सामन्यात पहिल्यांदा द्विशतक केले. त्याच्यावर अनेकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला असून अभिनेता सुनिल शेट्टीनंही त्याचं कौतुक केलंय.

Suniel Shetty praises Yashaswi Jasiwal
सुनिल शेट्टीने केलं यशस्वी जयस्वालचे कौतुक

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 3, 2024, 3:28 PM IST

मुंबई- भारतीय क्रिकेटपटू यशस्वी जयस्वालने पहिले कसोटी द्विशतक झळकावल्याबद्दल अभिनेता सुनील शेट्टीने कौतुक केले. इन्स्टाग्राम स्टोरीवर सुनिलने एक फोटो शेअर केला आणि त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले, "मानसिकदृष्ट्या मजबूत, दृढनिश्चयी, निर्भयी आणि शुद्ध प्रतिभा असलेला यशस्वी : जैसा नाम वैसा काम."

सुनिल शेट्टीने केलं यशस्वी जयस्वालचे कौतुक

यशस्वी जयस्वाल शनिवारी कसोटी द्विशतक झळकावणारा तिसरा सर्वात तरुण भारतीय खेळाडू ठरला. विशाखापट्टणम येथे खेळला जात असलेल्या इंग्लंड विरुद्ध भारतच्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान त्याने ही कामगिरी केली. या सामन्यात त्याने 290 चेंडूत 19 चौकार आणि सात षटकारांसह 209 धावांची दमदार खेळी केली. त्याने या सामन्यात आपल्या धावा 72.06 च्या स्ट्राइक रेटने केल्या. अखेर त्याला वेगवान आणि अनुभवी जेम्स अँडरसनने बाद केले. यशस्वी जयस्वालनंतर भारतासाठी शुभमन गिलने सर्वाधिक 34 धावा काढल्या आहेत. भारताचा पहिला डाव 396 धावात आटोपला.

22 वर्षे आणि 37 दिवस वयाचा जयस्वाल कसोटीत दुहेरी शतक झळकावणारा तिसरा सर्वात तरुण भारतीय खेळाडू आहे. भारतासाठी दुहेरी शतक झळकावणारा सर्वात तरुण खेळाडू म्हणजे विनोद कांबळी, त्याने द्विशतक झळकवले तेव्हा त्याचे वय 21 वर्षे 35 दिवस होते. त्याने 1994 मध्ये मुंबईत इंग्लंडविरुद्ध 224 धावांची खेळी केली होती. भारतीय फलंदाज सुनील गावस्कर यांच्या नावावर दुहेरी झळकावणारा सर्वात तरुण भारतीय खेळाडूचा विक्रम होता. कांबळीच्या आधी त्यांनी 1971 मध्ये पोर्ट ऑफ स्पेन येथे वेस्ट इंडिजच्या कडवट हल्ल्याविरुद्ध 220 धावा केल्या होत्या तेव्हा त्यांचे वय 21 वर्षे आणि 283 दिवस इतके होते.

यशस्वी जयस्वाल हा सौरव गांगुली, गौतम गंभीर आणि कांबळी यांच्याशिवाय कसोटी सामन्यात दुहेरी शतक झळकावणारा चौथा भारतीय डावखुरा खेळाडू आहे. त्याने आपले पहिले द्विशतक पूर्ण करण्यासाठी फक्त 10 डाव घेतले आहेत. करुण नायरने फक्त तीन डावात भारतासाठी पहिले द्विशतक झळकावले होते, ही कामगिरी करणारा तो सर्वात वेगवान भारतीय ठरला होता.

आतापर्यंत सहा कसोटी आणि 10 डावांमध्ये यशस्वी जयस्वालने 10 डावात 68.88 च्या सरासरीने आणि 63.85 च्या स्ट्राईक रेटने 620 धावा केल्या आहेत. त्याने एक शतक, एक द्विशतक आणि दोन अर्धशतके झळकावली आहेत. या फलंदाजाने 16 टी ट्वेन्टी डावांमध्ये 33.46 च्या सरासरीने आणि एक शतक आणि चार अर्धशतकांसह 161.93 च्या स्ट्राइक रेटने 502 धावा केल्या आहेत.

वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी जयस्वालने इराणी चषक, दुलीप ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी आणि कसोटीमध्ये दुहेरी शतके झळकावली आहेत. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील विशाखापट्टणम कसोटी सामन्याचा दुसरा दिवस सुरू आहे. जयस्वालच्या मॅरेथॉन खेळीमुळे भारत पहिल्या डावात 396 धावा केल्या आहेत.

हेही वाचा -

  1. "अभी मैं जिंदा हूं", पूनम पांडेनं दिला जिवंत असल्याचा पुरावा, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...
  2. पूनम पांडेच्या मृत्यूची बातमी खोटी, व्हिडिओ जारी करुन रोजलीनने व्यक्त केली शंका
  3. चिखलात लोळल्यानंतर 'उंचा लंबा कद' गाण्यावर थिरकला अक्षय कुमार

ABOUT THE AUTHOR

...view details