मुंबई - सलमान खानची पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर जादू सुरू झाली आहे. त्याच्या सिकंदर या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या फर्स्ट लूकनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या अॅक्शन-पॅक्ड ड्रामा असलेल्या टीझरमधील सलमानच्या सिग्नेचर स्टाइलनं आणि आक्रमक अवतारानं इंटरनेटवर वादळ निर्माण झालं आहे.
सिकंदरच्या टीझरला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. टीझर रिलीज झाल्यानंतर त्याला प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून प्रचंड प्रेम आणि दाद मिळाली आहे. सलमान खानच्या दमदार आणि व्यक्तिमत्त्वाचं प्रदर्शन करणाऱ्या या टीझरमध्ये भाईजानच्या भव्य कमबॅकची घोषणा करण्यात आली आहे. टीझरला ब्लॉकबस्टर प्रतिसाद आणि उत्तम रिव्ह्यू मिळालं आहेत. या टीझरला यूट्यूबवर आतापर्यंत 5 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळालं आहेत.
इतकेच नाही तर हा चित्रपट 5000 स्क्रीन्सवर फक्त हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. सिकंदर हा चित्रपट सलमान खानच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या रिलीजपैकी एक आहे. विशेष म्हणजे सिकंदरला प्रेक्षकांचा एवढा ऐतिहासिक प्रतिसाद मिळाला आहे, जो सलमान खानच्या कोणत्याही चित्रपटाला दीर्घकाळात मिळालेला नाही. टायगर जिंदा है नंतर सिकंदर हा सलमान खानचा सर्वात मोठा आणि सर्वाधिक गाजलेला चित्रपट ठरु शकेल असा अंदाज आहे.
सलमान खानच्या सिकंदरनं टीझरमधूनच लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केलं असून आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. सलमान खान, रश्मिका मंदान्ना आणि काजल अग्रवाल स्टारर सिकंदर चित्रपट 2025 च्या ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.
या ईदला सलमान खान बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची विक्रमी ओपनिंग आणि भभरपूर कमाई करून इतिहास रचण्यासाठी सज्ज आहे. सलमान खानच्या 'सिकंदर' चित्रपटाची पहिली झलक शनिवारी 28 डिसेंबर रोजी लॉन्च करण्यात आली. अपेक्षेनुसार चाहत्यांना खूश करण्यात निर्माता यशस्वी झाल्याचं या टीझरवरुन लक्षात येतंय. बॉलिवूडचा सुपरस्टार म्हणून असलेली सलमानची ओळख पुन्हा प्रस्थापिक करण्यासाठी तो खूप आग्रही आहे. सलमानला भव्य पडद्यावर पुन्हा एकदा प्रस्थापित करण्यासाठी दिग्दर्शक एआर मुरुगादास आपलं कसब पणाला लावताना या सिनेमात दिसणार आहे. या चित्रपटाच्या टीझरला मिळालेल्या प्रतिसादावरुन सलमान आगामी काळात बॉलिवूडवर आधिराज्य गाजवू शकतो, असंच वाटत आहे.