मुंबई : बॉलिवूडची लेडी दबंग सोनाक्षी सिन्हा तिचा पती झहीर इक्बालबरोबर लग्नानंतर खूप एन्जॉय करत आहे. 23 जून 2024 रोजी लग्न झाल्यानंतर सोनाक्षी सिन्हा दोनदा हनिमूनला गेली होती. याशिवाय हनिमूननंतर सोनाक्षी आणि झहीर पुन्हा-पुन्हा एन्जॉय करण्यासाठी सुट्टीवर जात आहे. सोनाक्षीनं पतीबरोबर ऑस्ट्रेलियात, भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटीचा आनंदही घेतला. सध्या सोनाक्षी नववर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी आपल्या पतीबरोबर कॅनबेरा येथे गेली आहे. दरम्यान या ठिकाणी एका काचेच्या खोलीच्या बाहेर अचानक सिंह आला. यानंतर सोनाक्षी हे दृष्य आपल्या फोनच्या कॅमेऱ्यात कैद केले. आता हा व्हिडिओ सोनाक्षी आणि झहीरनं आपल्या इंस्टाग्राम शेअर केला आहे.
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालचा व्हिडिओ : सोनाक्षी व्हिडिओत तिच्या बेडवर बसल्याची दिसत आहे. ती एका काचेच्या घरातून बाहेर सिंह गर्जना करत असलेल्या सिंहाकडे पाहत आहे. याशिवाय झहीरनं देखील हे दृश्य आपल्या फोनमध्ये टिपले आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये या जोडप्यानं लिहिलं आहे की, 'आजचे अलार्म घड्याळ आणि सकाळी 6 वाजले आहेत.' आता या दोघांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. याशिवाय या जोडप्यानं एक बिबट्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सोनाक्षी आणि झहीर दोघेही बिबट्याच्या पाठीवरून हात फिरवताना दिसत आहेत. हा बिबट शांतपणे झोपलेला आहे. याशिवाय झहीर आणखी एक व्हिडिओ शेअर केला यामध्ये सिंह आणि सिंहनी घराबाहेर खेळताना दिसत आहेत.
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालचं लग्न : सोनाक्षीनं यापूर्वी देखील असे काही व्हिडिओ झहीरबरोबर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती मस्ती करताना दिसत आहे. हे जोडपे 23 जून रोजी लग्नाच्या बंधनात अडकले. या दोघांनी 2022 मध्ये आलेल्या 'डबल एक्सएल' चित्रपटात एकत्र काम केलं होतं. यानंतर या दोघांनी एकामेंकाना बऱ्याच वर्ष डेट केलं. सोनाक्षीचं लग्न तिच्या घरी करण्यात आले. यानंतर लग्नाचे भव्य रिसेप्शन देण्यात आलं. या जोडप्याच्या रिसेप्शनमध्ये सलमान खान, काजोल, रेखा आणि हुमा कुरेशी या कलाकारांनी हजेरी लावली होती. सोनाक्षी आणि झहीरचं लग्न सोशल मीडियावर खूप चर्चाचा विषय बनला होता. या दोघांना अनेकांनी ट्रोल केलं होतं. या लग्नामुळे सोनाक्षीच्या कुटुंबातील सदस्य देखील नाराज असल्याचे दिसले होते.
हेही वाचा :