महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'फतेह' स्टार सोनू सूदनं केलं सहकलाकार जॅकलीन फर्नांडिस कौतुक, वाचा सविस्तर - SONU SOOD AND JACQUELINE FERNANDEZ

सोनू सूदनं त्याचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'फतेह'ची सहकलाकार जॅकलीन फर्नांडिसचं कौतुक केलं आहे.

Sonu Sood and Jacqueline Fernandez
सोनू सूद आणि जॅकलीन फर्नांडिस (सोनू सूद (Song Poster))

By ETV Bharat Entertainment Team

Published : Jan 8, 2025, 4:10 PM IST

मुंबई : आपल्या अस्सल कामासाठी आणि परोपकारासाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता सोनू सूद सध्या त्याच्या आगामी 'फतेह' चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. अलीकडे 'दंबग' स्टारनं 'फतेह' चित्रपटाची सहकलाकार जॅकलीन फर्नांडिसचं कौतुक केलंय. दरम्यान त्यानं जॅकलीनचं वर्णन 'सर्वोत्तम मुलींपैकी एक' असल्याचं केलंय. त्यानं संवादादरम्यान आतापर्यंत सर्वांत सुंदर मन असलेल्या मुलीबरोबर काम केलं असल्याचं सांगितलं. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत त्यानं जॅकलीनच्या डाउन-टू-अर्थ स्वभावाची प्रशंसा केली.

सोनू सूदनं केलं जॅकलीनचं कौतुक :सोनू कौतुक करताना म्हटलं, "जॅकलीन मला भेटलेल्या सगळ्यात छान मुलींपैकी एक आहे, माझ्या संपूर्ण करिअरमध्ये तिच्याबरोबर काम करणे सर्वात सोपी होतं, ती वेळेवर सेटवर येते. तिला व्हॅनिटी व्हॅन मिळो किंवा नाही, 'जॅकलीननं सेटवर समर्पण आणि नम्रतेवर जोर दिला." 'फतेह'च्या शूटिंगदरम्यान अमृतसरमध्ये घडलेल्या एका घटनेची आठवण करून, सोनूनं जॅकलीनचं डाउन-टू-अर्थ व्यक्तिमत्व कसे समोर आलं याबद्दल सांगितलं. त्यानं म्हटलं, "मला आठवते की, आम्ही अमृतसरमध्ये शूटिंग करत होतो. तिथे गजबजलेला पंजाबी बाजार होता, एक चेज सीक्वेंस चालू होता. ती तिथे एका कोपऱ्यात स्टूलवर शांतपणे बसून शाळकरी मुलांशी गप्पा मारत होती. जेव्हा टीम मेंबरनं तिला काही हवे आहे का? असं विचारलं, तेव्हा ती म्हणाली, नाही, मी ठीक आहे आणि तिथेच बसली. व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाण्याचा हट्टही तिनं केला नाही. तिची व्हॅन लावायला जागा नव्हती आणि तिचा शॉट तयार नसतानाही ती दोन तास थांबून म्हणाली, तुम्ही लोक पुढे जा."

'फतेह' कधी होणार प्रदर्शित :जॅकलीनच्या वृत्तीचे कौतुक करताना सोनू म्हटलं, "मला वाटते की तो खूप चांगली आत्मा आहे." सोनू आणि जॅकलिन लवकरच फतेह या बहुप्रतीक्षित ॲक्शन थ्रिलर चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. 'फतेह' हा चित्रपट 10 जानेवारी 2025 रोजी बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे. जॅकलीन तिच्या सकारात्मकतेसाठी ओळखली जाते. दुसरीकडे वास्तविक जीवनात सोनू सूदही परोपकारी आणि प्रेरणादायी व्यक्ती आहे. आता या दोघांची जोडी बॉक्स ऑफिसवर किती कमाल करेल हे काही दिवसात समजेल.

हेही वाचा :

  1. सलमान खान आणि महेश बाबू यांनी शेअर केला सोनू सूद स्टारर 'फतेह'चा दुसरा ट्रेलर
  2. शिर्डीत झालेल्या फसवणुकीची गोष्ट 'फतेह'मध्ये दाखवणार, साईंच्या दर्शनानंतर सोनू सूदचा खुलासा
  3. सोनू सूदनं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद का नाकारलं? ही 'कारणं' आली समोर

ABOUT THE AUTHOR

...view details