महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'काकुडा'च्या स्पेशल स्क्रिनिंगमध्ये सोनाक्षी सिन्हा आणि रितेश देशमुखसह इतर स्टार्सनं केली धमाल - KAKUDA SPECIAL SCREENING - KAKUDA SPECIAL SCREENING

'Kakuda' Special Screening: सोनाक्षी सिन्हा आणि रितेश देशमुख यांचा आगामी चित्रपट 'काकुडा' 12 जुलै रोजी ओटीटीवर प्रवाहित होण्यासाठी सज्ज आहे. रिलीजपूर्वी, निर्मात्यांनी चित्रपटाचे एक विशेष स्क्रीनिंग आयोजित केलं होत. यामध्ये अनेक बॉलिवूड स्टार्सनं हजेरी लावली होती.

Kakuda Special Screening
काकुडा स्पेशल स्क्रिनिंग ((IMAGE- ANI))

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 11, 2024, 5:29 PM IST

मुंबई - Kakuda Special Screening : सोनाक्षी सिन्हा आणि रितेश देशमुखचा हॉरर-कॉमेडी 'काकुडा' 12 जुलै रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखल होणार आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, रितेश देशमुख आणि साकिब सलीम, सचिन विद्रोही यांच्या भूमिका मुख्य आहेत. रिलीजपूर्वी, 'काकुडा' निर्मात्यांनी इंडस्ट्रीतील लोकांसाठी मुंबईत एक विशेष स्क्रीनिंगचं आयोजित केलं होतं. या कार्यक्रमात सोनाक्षीचा पती झहीर इक्बाल आपल्या पत्नीला चिअर करण्यासाठी आला होता. याशिवाय 'बिग बॉस-16'चे स्पर्धक शिव ठाकरे, 'मुंज्या' कलाकारांसह अनेक टीव्ही स्टार्स देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

'काकुडा' चित्रपटाचं स्पेशल स्क्रिनिंग : 'काकुडा'च्या स्पेशल स्क्रिनिंगमध्ये अनेक स्टार्सची झलक समोर आली आहे. या खास प्रसंगी चित्रपटाची सोनाक्षी सिन्हानं तिच्या बॉसी लूकनं सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. सोनाक्षीचा पती झहीरनं स्टाईलमध्ये आपली ग्रँड एंट्री केली. सोनाक्षीनं पांढऱ्या शर्टवर ब्लॅक ब्लेझर सूट घातला होता. नवविवाहित जोडप्यानं पापाराझींना यावेळी फोटोसाठी पोझ दिल्या. यादरम्यान, दोघांनी थिएटरमध्ये जाण्यापूर्वी एकमेकांशी मनमोकळेपणानं चर्चा केली. 'बिग बॉस-16' स्पर्धक शिव ठाकरे, 'मुंज्या' अभिनेत्री शर्वरी वाघ, अभय वर्मा, रितेश देशमुख, मन्नारा चोप्रा, हेमंत सिंग, साकिब सलीम, 'इश्क विश्क रिबाउंड' चित्रपट अभिनेता जिब्रान खान यांच्यासह अनेक स्टार्स 'काकुडा'च्या स्पेशल स्क्रिनिंगमध्ये खूप धमाल केली.

काकुडा स्पेशल स्क्रिनिंग (ETV Bharat)

'काकुडा' चित्रपटाबद्दल : रितेश देशमुखच्या 'काकुडा'बद्दल सांगायचं झालं तर ,हा चित्रपट आरएसव्हीपी मुव्हीज अंतर्गत तयार करण्यात आला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केलंय. या चित्रपटाची कहाणी चिराग गर्ग आणि अविनाश द्विवेदी यांनी लिहिली आहे. 'काकुडा' चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रूव्हाला यांनी केली आहे. हा चित्रपट झी 5वर प्रदर्शित होणार आहे. आता अनेक चाहते या चित्रपटाच्या रिलीजमुळे खूप आनंदी आहेत. दरम्यान आदित्य सरपोतदार यांनी याआधी 'मुंज्या' चित्रपटाद्वारे आपले कौशल्य दाखवले आहे. त्यांचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details