मुंबई - Sonakshi Sinha Wedding : शत्रुघ्न सिन्हा यांचा मुंबईतील 'रामायण' हा बंगला लेक सोनाक्षीच्या लग्नाच्या निमित्तानं सजला आहे. सोनाक्षी सिन्हा आणि तिचा बॉयफ्रेंड झहीर इक्बाल उद्या 23 जूनला लग्न करणार आहेत. सोनाक्षी सिन्हाचं घर दिव्यांनी उजळून निघाले असून तिच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे. काल सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी एकमेकांच्या कुटुंबियांच्या बरोबर रात्रीच्या जेवणाचा आस्वाद घेतला. यावेळी झहीर इक्बाल हा त्याचे भावी सासरे शत्रुघ्न सिन्हा यांच्याबरोबर दिसला. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालच्या लग्नाच्या जल्लोषाला सुरुवात झाली असून सोनाक्षी-इक्बालच्या मेहंदी सोहळ्याचे फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालचे अनेक मित्र मेहंदी सोहळ्याला उपस्थित होते. या जोडप्याच्या मित्रानं सोशल मीडियावर हा फोटो शेअर केला आहे. मेहंदीचा एक सुंदर फोटो देखील यामध्ये सामील केला आहे. मेहंदी सोहळ्याच्या या फोटोमध्ये सोनाक्षी आणि झहीर एकत्र उभे आहेत. सोनाक्षी सिन्हानं मरून रंगाचा ड्रेस घातला असून झहीर इक्बाल प्रिटेंट कुर्ता आणि पांढरा पायजम्यामध्ये दिसत आहे. इंस्टाग्रामवर पापाराझीनं पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये सिन्हा यांच्या रामायण इमारतीला आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. सोनाक्षीचे वडील शत्रुघ्न सिन्हा हे प्री-वेडिंग सेलिब्रेशन होस्ट करत आहेत.