मुंबई - Sonakshi Sinha Wedding : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही 'हीरामंडीः द डायमंड बाजार' या वेब सीरीजमुळे चर्चेत आहे. आता सोनाक्षी तिच्या आयुष्यातील एका नव्या अध्यायाच्या तयारीत आहे. ती बॉयफ्रेंड झहीर इक्बालबरोबर 23 जून रोजी मुंबईत लग्न करणार असल्याची चर्चा आहे. सोनाक्षी आणि झहीर खूप दिवसांपासून डेट करत आहेत. मात्र त्यांनी कधीच सार्वजनिकरित्या त्याच्या नात्याबद्दल वाच्यता केली नाही. सोनाक्षी आणि झहीर सोशल मीडियावर अनेकदा एकामेकांबरोबर सुंदर फोटो शेअर करत असतात. दरम्यान रिपोर्ट्सनुसार, 'हीरामंडीः द डायमंड बाजार'च्या संपूर्ण कलाकारांना लग्नासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे.
सोनाक्षी सिन्हा वेडस् झहीर इक्बाल ?: लग्नाची आमंत्रण पत्रिका मॅगझिनच्या मुखपृष्ठाप्रमाणे डिझाइन केले गेली आहे. या आमंत्रण पत्रिकेवर मजकूर लिहिला आहे की, "अफवा खऱ्या आहेत." मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सोहळ्यासाठी तयारी सुरू आहे. या जोडप्याचे जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार आहेत. सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नाला अद्यापही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मात्र आता सोशल मीडियावर त्याच्या लग्नाबद्दल बरीच चर्चा होताना दिसत आहेत. दरमयान सोनाक्षीच्या 37 व्या वाढदिवसानिमित्त झहीरनं स्वतःचे आणि सोनाक्षीचे रोमँटिक आणि इंटरेस्टिंग क्षणांचे फोटोज पोस्ट केले होते.