मुंबई - Sonakshi sinha and zaheer iqbal : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी 23 जून रोजी लग्न केल्यानंतर हे जोडपे खूप चर्चेत आले होते. आता पुन्हा एका या जोडप्याबद्दलच्या बातम्या सोशल मीडियावर पसरत आहेत. लग्नानंतर सोनाक्षी आणि झहीर दोघेही हनिमून एन्जॉय करत आहेत. मंगळवारी सोनाक्षीनं झहीरबरोबरचे स्विमिंग पूलमधील एन्जॉय करतानाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. तसेच झहीरनं देखील त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर सोनाक्षीचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती हसताना दिसत आहे. याशिवाय झहीरचं देखील हसणे यात ऐकू येत आहेत.
सोनाक्षी आणि झहीरनं शेअर केले फोटो आणि व्हिडिओ : हा व्हिडिओ शेअर करत झहीरनं यावर लिहिलं की, "ती माझ्यावर ओरडणार होती, पण मी तिला हसवले." सोनाक्षी आणि झहीर दोघेही लग्नानंतर वेगवेगळ्या ठिकाणी फिरताना दिसत आहेत. याआधी सोनाक्षी आपल्या कुटुंबाबरोबर फॅमिली डिनर गेली होती. यावेळी झहीर इक्बालच्या आई आणि वडिलांनं तिच सुंदर पद्धतीनं स्वागत केलं होतं. दरम्यान सोनाक्षी आणि झहीरनं नोंदणीकृत लग्न केलंय. सोनाक्षीच्या घरी हे लग्न पार पडले होते. यानंतर या दोघांनी कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांसाठी रिसेप्शनचे आयोजन केले होते. लग्नाची नोंदणी झाली असली तरी त्याआधी शत्रुघ्न सिन्हा आणि त्याची पत्नी पूनम सिन्हानं कन्यादान केलं होतं.