मुंबई : निर्माता रोहित शेट्टीचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'सिंघम अगेन'नं रिलीज होण्यापूर्वीच एक मैलाचा दगड पार केला आहे. 'सिंघम अगेन'ची आगाऊ बुकिंग भारतातील काही चित्रपटगृहांमध्ये सुरू झाली आहे. दरम्यान 'भूल भुलैया 3'पेक्षा जास्त स्क्रीन 'सिंघम अगेन' मिळाल्या आहेत. 'सिंघम अगेन'ला सर्व ठिकाणी प्रदर्शित होणाऱ्या एकूण शोकेसपैकी 56% मिळेल. आणि भूल भुलैया 3ला 46% मिळणार आहे. आगामी काळात या जागा वाढविण्यात येईल.अलीकडेच व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी त्यांच्या सोशल मीडियावर 'सिंघम अगेन'बद्दल एक अपडेट शेअर केली आहे.
'सिंघम अगेन' होणार परदेशात 197 स्क्रीन्सवर प्रदर्शित :यामध्ये त्यांनी सांगितलं की, 'सिंघम अगेन' ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि फिजीमध्ये 197 स्क्रीन्सवर प्रदर्शित होणार आहे. आता ही कामगिरी खूप मोठी आहे. 'सिंघम अगेन'नं याबाबत सर्व हिंदी चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. 'सिंघम अगेन' पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे, जो सिडनीच्या ड्राईव्ह इन सिनेमात प्रदर्शित होईल. एकट्या ऑस्ट्रेलियातही हा चित्रपट 143 स्क्रीन्सवर प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर 1 नोव्हेंबरला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची स्पर्धा बॉक्स ऑफिसवर कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया 3' चित्रपटाबरोबर होणार आहे.