मुंबई - Sikander Viral Photos :अभिनेता सलमान खान आणि साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्ना स्टारर बहुप्रतीक्षित चित्रपट 'सिकंदर'च्या शूटिंगचे पहिलं शेड्युल पूर्ण झालं आहे. या चित्रपटाच्या सेटवरचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. हे फोटो सेटवरून घेण्यात आल्याचं समजतं आहे. व्हायरल झालेल्या एका फोटोमध्ये सलमान खानची झलक पाहायला मिळत आहे. यामध्ये तो धुरकट वातावरणात उभा असल्याचं दिसत आहे. या फोटोद्वारे चित्रपटातील जबरदस्त ॲक्शन सीक्वेन्स शूट करण्यात येणार असल्याचं समजत आहे. दुसरा फोटोत एक माणूस दिसत आहे, याची ओळख अद्याप झालेली नाही. तसेच आणखी एका फोटोमध्ये चित्रपटाची मुख्य अभिनेत्री रश्मिका मंदान्ना एका महिला चाहतीबरोबर दिसत आहे.
सिकंदरचे शूटिंग पूर्ण : रिपोर्ट्सनुसार, मुंबईत 'सिकंदर'च्या शूटिंगचे पहिले शेड्यूल 1 जुलै रोजी संपले. वांद्रे येथील ताज लँड्स एंड येथे सलमान खानबरोबर मुख्य ॲक्शन सीक्वेन्ससह शूटिंग होईल. सलमान चित्रकूट मैदानावर अभिनेता प्रतीक बब्बरबरोबर एक महत्त्वाचा ॲक्शन सीन शूट करेल. यामध्ये विमान आणि विशेष सेटचादेखील समावेश असेल. या चित्रपटाचे पहिले शेड्यूल शूटिंग 19 जूनपासून सुरू झाले होते. शूटिंगची सुरुवात सलमान खानच्या काही दृश्यांमधून झाली. हा सीन मुंबईत शूट करण्यात आला होता.