मुंबई :बॉलिवुड अभिनेता सलमान खानचा वाढदिवस 27 डिसेंबर रोजी आहे. तो या दिवशी आपला 58वा जन्मदिवस साजरा करणार आहे. आता अनेकांना ही आशा आहे की, सलमानच्या वाढदिवशी त्यांना काहीतरी गिफ्ट मिळू शकते. आता एक बातमी समोर आली आहे. 'भाईजान'च्या वाढदिवसाच्या दिवशी 'सिकंदर' चित्रपटाचा टीझर हा रिलीज होऊ शकतो. याशिवाय या टीझरचा रनटाईम देखील समोर आला आहे. 'सिकंदर'चा टीझर हा 80 सेंकदाचा असणार आहे. तसेच या चित्रपटामधील काही दृश्य देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एआर मुरुगदास दिग्दर्शित 'सिकंदर' हा चित्रपट 2025 मध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.
सलमान खानचा 'सिकंदर'मधील फर्स्ट लूक : सध्या 'सिकंदर' या चित्रपटावर खूप वेगानं काम सुरू आहे. या चित्रपटाकडून चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत. दरम्यान 'बेबी जॉन'च्या प्रमोशनसाठी वरुण हा 'भाईजान'च्या शो 'बिग बॉस 18'मध्ये गेला होता. यावेळी त्यानं खुलासा केला की, सलमान खानच्या आगामी चित्रपट 'सिकंदर'मधून त्यांचा फर्स्ट लूक येणार आहे. हा लूक त्याचा 27 डिसेंबरला येईल. आता ही बातमी समोर आल्यानंतर अनेकजण 'भाईजान'चा लूक पाहण्यासाठी उत्सुक आहेत. एका रिपोर्टनुसार सलमानच्या वाढदिवशी निर्माते या चित्रपटाचा टीझर देखील रिलीज करून चाहत्यांना खुश करू शकतात. मात्र सध्या या बातमीबद्दल निर्मात्यांनी काहीही अधिकृत विधान केलेलं नाही.