महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

श्रेयस तळपदे, विजय राज स्टारर सायकोलॉजिकल थ्रिलर 'कर्तम भुगतम'ची रिलीज तारीख जाहीर - Kartam Bhugtam - KARTAM BHUGTAM

आगामी सायकोलॉजिकल थ्रिलर 'कर्तम भुगतम'च्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या रिलीज डेट जाहीर केली आहे. सोहम पी शाह दिग्दर्शित या चित्रपटात श्रेयस तळपदे, विजय राज, मधु आणि अक्षा परदासनी यांच्या भूमिका आहेत.

Thriller Kartam Bhugtam
'कर्तम भुगतम'ची रिलीज तारीख जाहीर

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 27, 2024, 5:34 PM IST

मुंबई - अभिनेता-दिग्दर्शक श्रेयस तळपदेची महत्त्वाची भूमीका असलेला 'कर्तम भुगतम' हा मानसशास्त्रीय थ्रिलर चित्रपट 17 मे रोजी रुपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. बुधवारी निर्मात्यांनी चित्रपटाच्या रिलीज तारखेची घोषणा केली. इम्रान खान स्टारर लक आणि असजय देवगण स्टारर काल यासारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या सोहम पी. शाह यांनी दिग्दर्शित 'कर्तम भुगतम' या चित्रपटात विजय राज, मधू आणि अक्षा परदासनी सारखे कलाकार देखील आहेत.

इंस्टाग्रामवर श्रेयसने थ्रिलरची घोषणा केली आणि कॅप्शनमध्ये लिहिले, "माझ्या वर्षातील चौथ्या चित्रपटाची घोषणा करत असताना मला मिळालेले आशीर्वाद मोजत आहे. 'कर्तम भुगतम - जे फिरते ते फिरते,' 'काल' आणि 'लक'च्या दिग्दर्शक सोहम पी.चा एक मनोवैज्ञानिक थ्रिलर. गांधर फिल्म्स अँड स्टुडिओ प्रा. लि. निर्मित, 'कर्तम भुगतम' हा पॅन इंडिया चित्रपट 17 मे 2024 रोजी हिंदी, तेलगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. माझ्यासाठी 2024 खरोखर एक आशीर्वाद आहे. तुमच्या सतत समर्थनासाठी धन्यवाद."

प्रेक्षकांना भुरळ घालणारा एक सिनेमॅटिक प्रवास म्हणून 'कर्तम भुगतम' या चित्रपटाकडे पाहलं जातंय. हा चित्रपट ज्योतिष आणि कर्म यांच्यातील गहन संबंधांचा शोध घेतो, प्रत्येक कृतीचे परिणाम स्पष्ट करतो म्हणून जुन्या हिंदी म्हणीप्रमाणे 'जैसे करोगे, वैसे भरोगे' प्रमाणे.

चित्रपटाविषयी बोलताना श्रेयस तळपदे म्हणाला की, 'कर्तम भुगतम' यामध्ये कालातीत सत्य सामावलेले आहे. जे आजूबाजूला जाते तेच येते. कर्म केव्हा आणि कसे उलगडते हे एक अगम्य स्वरुपाचं गूढ सत्य आहे. शीर्षकानेच श्रेयसला खिळवून ठेवले आणि त्याच्या नावाप्रमाणेच वेधक कथेचे आश्वासन त्याला मिळाले. अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणारा हा चित्रपट गंधार फिल्म्स अँड स्टुडिओ प्रा. लि. ने निर्माण केला आहे.

हेही वाचा -

  1. 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो'मध्ये रणबीर कपूरनं केला मोठा खुलासा; नीतू कपूर झाली धक्क - Ranbir Kapoor
  2. विन डिझेलनं दीपिका पदुकोण आणि दिग्दर्शक डीजे कारुसोबरोबरचा थ्रोबॅक फोटो केला शेअर - Vin Diesel
  3. 'मगधीरा', 'रंगस्थलम' आणि 'आरआरआर' : राम चरणच्या उत्तुंग कारकिर्दीचा चढता आलेख - Ram Charan Birthday

ABOUT THE AUTHOR

...view details