महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

श्रेयस तळपदे झाला पुन्हा सक्रिय, 'ही अनोखी गाठ'चा ट्रेलर रिलीज - श्रेयस तळपदे

Shreyas Talpade Health Update : श्रेयस तळपदे हृदयविकाराच्या झटक्यानंतर आता बरा झाला आहे. आता तो शूटिंगला परतल्याचं त्यानं एक मुलाखतीदरम्यान सांगितलं आहे. दरम्यान त्याची प्रमुख भूमिका असलेल्या 'ही अनोखी गाठ' हा चित्रपट रिलीज होत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला.

Shreyas Talpade Health Update
श्रेयस तळपदे हेल्थ अपडेट

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 13, 2024, 10:54 AM IST

Updated : Feb 13, 2024, 11:00 AM IST

मुंबई - Shreyas Talpade Health Update :हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीमधील अभिनेता श्रेयस तळपदेला दोन महिन्यांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. हृदयविकाराच्या झटक्याची बातमी ऐकून त्याचे चाहते आणि चित्रपटसृष्टीतील कलाकार अस्वस्थ झाले होते. पण आता श्रेयसची तब्येत बरी झाली आहे. आता श्रेयस त्याच्या आगामी चित्रपटाच्या रिलीजसाठी सज्ज झाला आहे. त्याच्या या चित्रपटाची कहाणी थोडी हटके आहे. 'ही अनोखी गाठ' असं शीर्षक असलेला हा चित्रपट 1 मार्चला चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये श्रेयसबरोबर गौरी इंगावेल दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन महेश मांजरेकरनं केलंय. श्रेयस सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.

'ही अनोखी गाठ' हा अनोखी प्रेमकहानी असलेला चित्रपट झी स्टुडिओनं बनवला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळत असल्याचं दिसतंय तर काहीजण टीकाही करत आहेत. "खूप छान काहीतर नवीन पाहायला मिळणार. तस नवीन नाही पण मराठी सिनेमासाठी नवीन आहे.", असे एका प्रेक्षकानं ट्रेलर पाहून लिहिलंय. "हा चित्रपट म्हणजे हिंदीतील हम दिल दे चुके सनमसारखा वाटत असून मराठी निर्मात्यांनी स्वतःला बदललं पाहिजे. कुणाचीही कॉपी करु नये", असे एकानं लिहिलंय. या चित्रपटात श्रेयसनं एका त्यागी पुरुषाची भूमिका केली आहे.

श्रेयसची प्रकृती :दरम्यान श्रेयसनं स्वतः त्याच्या प्रकृतीची माहिती दिली आणि तो आता कामावर परतल्याचं सांगितलं. त्याच्या कठीण काळात ज्यांनी त्याला मदत केली त्या सर्वांचं श्रेयसनं आभार मानले आहेत. श्रेयसनं एका मुलाखतीत सांगितलं की, ''त्या रात्री तिथे उपस्थित असलेल्या सर्वांचे मला आभार मानायचे आहेत. डॉक्टर, रुग्णालयातील कर्मचारी आणि ज्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली त्याचं मी आभार मानतो. माझी प्रकृती आता ठीक आहे आणि मी आता कामावर परतलो आहे.''

श्रेयस तळपदेच्या तब्येत सुधार : शूटिंगला परतल्यावर श्रेयस सांगितलं की ''मी आता काम करायला सुरुवात केली आहे, पण मला वाटतं की, या आयुष्यात लोकांचं ऋण फेडणं खूप कठीण आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानं आता काही गोष्टी पुढे सरकू लागल्या आहेत.'' 14 डिसेंबरला छातीत दुखू लागल्यानंतर श्रेयसची तब्येत अचानक बिघडली. यानंतर त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली. श्रेयस आता बरा आहे आणि दिवसेंदिवस रिकव्हर होत आहे. श्रेयस रुग्णालयात असताना त्याच्या चाहत्यांनी आणि चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी त्याची तब्येत ठीक होण्यासाठी प्रार्थना केली होती.

श्रेयसचे आगामी चित्रपट :वर्क फ्रंटबद्दल बोलायच झालं तर तो 'वेलकम टू द जंगल' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाची स्टारकास्ट खूप मोठी आहे. अक्षय कुमार, रवीना टंडन, दिशा पटानी, संजय दत्त, अर्शद वारसी, तुषार कपूर, परेश रावल यांच्यासह अनेक कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय श्रेयस रोहित शेट्टी दिग्दर्शित 'गोलमाल 5' अजय देवगनबरोबर दिसणार आहे. हा चित्रपट 04 नोव्हेंबर 2024 रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होत असल्याचं म्हटलं जात आहे.

हेही वाचा :

  1. जॅकलीन फर्नांडिसची सुकेश चंद्रशेखर विरोधात दिल्ली पोलिसात तक्रार, मनी लाँड्रिंगच्या प्रकरणाला लागणार वेगळं वळण?
  2. मनोज बाजपेयींच्या 'सर्वोत्कृष्ट अभिनया'चे कौतुक करताना कंगना रणौतने उडवली 'नेपो किड्स'ची खिल्ली
  3. मुनावर फारुकी आणि हिना खान म्युझिक व्हिडिओमध्ये दिसणार? व्हायरल व्हिडिओतून मिळाले संकेत
Last Updated : Feb 13, 2024, 11:00 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details