ETV Bharat / entertainment

'पुष्पा 2'नं बॉक्स ऑफिसवर सलग दुसऱ्या दिवशी सिंगल डिजिटमध्ये केली कमाई, जाणून घ्या आकडा... - PUSHPA 2 BOX OFFICE COLLECTION

'पुष्पा 2'नं सलग दुसऱ्या दिवशी सिंगल डिजिटमध्ये कमाई केली आहे. आता 26व्या दिवसापेक्षा 27व्या दिवशी या चित्रपटानं चांगली कमाई केली आहे.

pushpa 2
पुष्पा 2 ('पुष्पा 2' प्रमोशन फोटो (ANI))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Jan 1, 2025, 11:22 AM IST

मुंबई : अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना स्टारर चित्रपट 'पुष्पा 2: द रुल' बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होऊन 27 दिवस झाले आहेत. या चित्रपटानं आतापर्यंत अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले आहेत. हा चित्रपट अजूनही थिएटरमध्ये धमाकेदार कमाई करत आहेत. बॉक्स ऑफिसवर 'मुफासा,' 'मार्को', 'मॅक्स', 'वनवास' आणि 'बेबी जॉन' यासारखे अनेक नवीन चित्रपटांच्या रिलीजबरोबर 'पुष्पा 2' स्पर्धा करत आहे. गेल्या दोन दिवसांपासून 'पुष्पा 2: द रुल'च्या कमाईत घसरण आली आहे. चौथ्या आठवड्यात सुकुमार दिग्दर्शित हा चित्रपट सिंगल डिजिटमध्ये कमाई करत आहे.

'पुष्पा 2: द रुल'चं कलेक्शन : सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, चौथ्या आठवड्यात 'पुष्पा 2'च्या कलेक्शनमध्ये थोडीशी घट झाली आहे. चौथ्या रविवारनंतर सोमवारी या चित्रपटानं कमी कमाई केली. यानंतर 26व्या दिवशी 'पुष्पा 2'नं 6.8 कोटीचा व्यवसाय बॉक्स ऑफिसवर केला होता. ही आतापर्यंतची सर्वात कमी कमाई आहे. दरम्यान 27व्या दिवशी अल्लू अर्जुन स्टारर या चित्रपटानं सर्व भाषांमध्ये 7.65 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं. 'पुष्पा 2'चं 27 दिवसांनंतर एकूण कलेक्शन 1171.45 कोटी झालंय. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोटींमध्ये कमाई करत आहे.

'पुष्पा 2: द रुल' हिंदी बॉक्स ऑफिस कलेक्शन : 'पुष्पा 2'नं हिंदी पट्ट्यात जोरदार कमाई केली आहे. या चित्रपटानं 775 कोटींहून अधिक कमाई करून एक इतिहास रचला आहे. 27व्या दिवशी 'पुष्पा 2'नं हिंदी बॉक्स ऑफिसवर 6.25 कोटींची कमाई केली. तर तेलुगूमध्ये या चित्रपटानं 1.17 कोटीचं कलेक्शन केलं. सुकुमारच्या चित्रपटानं हिंदी पट्ट्यात एकूण 782 कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट हळूहळू 800 कोटींच्या क्लबकडे वाटचाल करत आहे. दरम्यान जगभरात या चित्रपटानं रुपेरी पडद्यावर 1760 कोटीहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटामध्ये अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना व्यतिरिक्त फहाद फासिल, जगपती बाबू आणि राव रमेश यांनी देखील जबरदस्त अभिनय केला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तेलुगू, हिंदी, तमिळ, कन्नड, मल्याळम अशा अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

हेही वाचा :

  1. 'पुष्पा 2'च्या समोर 'बेबी जॉन'ची झाली हवा, वीकेंडला किती केली कमाई जाणून घ्या...
  2. अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा 2'ची बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई, जाणून घ्या आकडा...
  3. अल्लू अर्जुनसह तेलुगू इंडस्ट्रीचे दिग्गज घेणार मुख्यमंत्र्यांची भेट, चेंगराचेंगरीच्या घटनेनं धास्तावले निर्माते

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.