मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांनी कुटुंबाबरोबर नवीन वर्ष साजरे केले आहेत. सध्या सोशल मीडियावर नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनचे त्यांचे काही फोटोज आणि व्हिडिओ समोर आले आहेत. एका फोटोंमध्ये रणबीर, आलिया, राहा, नीतू कपूर, रिद्धिमा, भरत साहनी आणि सोनी राजदान एकत्र पोझ देताना दिसत आहेत. आता या सेलिब्रटींचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. यामध्ये रणबीर आणि आलियाचा एक व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये रणबीर आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य आकाशाकडे पाहत आहेत. यानंतर अचानक घड्याळात 12 वाजते आणि फटाके फुटतात.
रणबीर आणि आलियाचा व्हिडिओ झाला व्हायरल : पुढं व्हिडिओत रणबीर हा सर्वात आधी आपल्या पत्नीला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी तिच्याकडे धाव घेतो. रणबीर हा आलियाला मीठी मारून नवीन वर्षाचा शुभेच्छा देतो. आता या जोडप्याचा हा व्हायरल झालेला व्हिडिओ त्यांच्या चाहत्यांना खूप आवडत आहेत. अनेकजण त्याच्या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका चाहत्यानं या व्हिडिओवर लिहिलं, 'बॉलिवूडमधील सर्वात सुंदर जोडपे.' दुसऱ्या एकानं लिहिलं, 'मला रणबीर आणि आलिया खूप आवडतात.' याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर करून त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
आलिया आणि रणबीरचं वर्कफ्रंट : न्यू ईयर सेलिब्रेशनचे फोटो नीतू कपूर आणि रिद्धिमा कपूर साहानी यांनी शेअर केले आहेत. तसेच फोटोत रणबीर आणि आलियाची मुलगी राहा कॅमेराकडे पाहत नसल्याचं दिसत आहे. तिला रणबीरनं कडेवर घेतल्याचं फोटोत दिसत आहे. राहानं नवीन वर्षानिमित्त फुलांचा प्रिंटेड फ्रॉक घातला आहे. या ड्रेसमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. दरम्यान या जोडप्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर आलिया आणि रणबीर संजय लीला भन्साळी यांच्या 'लव्ह अॅंन्ड वॉर' या चित्रपटामध्ये एकत्र दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर अभिनेता विकी कौशल देखील असेल. याशिवाय रणबीर हा 'रामायन' आणि 'धुम 4'मध्ये झळकणार आहे. तर आलिया ही 'अल्फा', 'मधुबाला', 'इन्शाअल्लाह' आणि 'तख्त' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.
हेही वाचा :