महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

जागतिक आरोग्य दिनानिमित्त शिल्पा शेट्टीनं आपल्या मुलीबरोबर वर्कआउट करतानाचा व्हिडिओ केला शेअर - Shilpa Shetty - SHILPA SHETTY

Shilpa Shetty on World Health Day: जागतिक आरोग्य दिनानिमित्त 'फिटनेस क्वीन' शिल्पा शेट्टीनं आपल्या मुलीबरोबरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. आता तिच्या या व्हिडिओवर अनेकजण कमेंट्स करत आहेत.

Shilpa Shetty and World Health Day
शिल्पा शेट्टी आणि जागतिक आरोग्य दिनानिमित्त

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 7, 2024, 4:09 PM IST

मुंबई Shilpa Shetty on World Health Day :जागतिक आरोग्य दिनानिमित्त हिंदी चित्रपटसृष्टीतील 'फिटनेस क्वीन' शिल्पा शेट्टी कुंद्रानं एक मोटिव्हेशनल वर्कआउटचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती मुलगी समिशाबरोबर दिसत आहे. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडिओत शिल्पा हनुमान चालीसा ऐकताना दिसत आहे. घरच्या जिममध्ये व्यायाम करताना शिल्पा मुलीबरोबर खेळत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना तिनं या पोस्टवर लिहिलं, 'जागतिक आरोग्य दिनाच्या शुभेच्छा, स्वस्थ रहा, मस्त रहा!'' आता शिल्पानं शेअर केलेल्या व्हिडिओवर अनेकजण कमेंट्स करुन तिला देखील या दिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

शिल्पा शेट्टीनं शेअर केला व्हिडिओ : शिल्पा अनेकदा तिच्या चाहत्यांना वर्कआउटसाठी प्रोत्साहित करत असते. जगभरातील लोकांना प्रभावित करणाऱ्या विशिष्ट आरोग्य विषयाकडं लक्ष वेधण्यासाठी दरवर्षी 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. आजच्या दिवसी 1948 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेचा (WHO) स्थापना झाली होती. दरम्यान या वर्षीची थीम 'माझे आरोग्य, माझे हक्क' अशी आहे, जी दर्जेदार आरोग्य सेवा, शिक्षण आणि माहिती मिळवण्याच्या मूलभूत मानवी हक्कांवर भर देते. या दिवसाचं विशेष महत्व आहे. या दिवशी आज अनेक कार्यक्रमाचं आयोजन केलं जाते.

शिल्पा शेट्टीचं वर्कफ्रंट : दरम्यान शिल्पा अलीकडंच रोहित शेट्टीच्या ओटीटी डेब्यू 'इंडियन पोलीस फोर्स'मध्ये दिसली होती, ज्यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा ​आणि विवेक ओबेरॉय देखील होते. ही वेब सीरीज ओटीटी प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन प्राईम ( Amazon Prime ) वर स्ट्रिम झाली आहे. ती पुढं व्ही रविचंद्रन, संजय दत्त रमेश अरविंद, शिल्पा शेट्टी, रेश्मा ननैय्या, जिशू सेनगुप्ता यांच्याबरोबर 'केडी-द डेव्हिल'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तिची भूमिका सत्यवतीची असणार आहे. 'केडी-द डेव्हिल' हा तामिळ, कन्नड, तेलुगु, मल्याळम आणि हिंदी भाषेत रिलीज होणार आहे. हा चित्रपट केव्हीएन प्रॉडक्शन अंतर्गत निर्मित केला जात आहे.

हेही वाचा :

  1. प्लॅस्टिक सर्जरीनं मंदिरा बेदींचा चेहरा उद्ध्वस्त; यूजर्सला बसला धक्का - Mandira Bedi New Look
  2. करीना कपूरनं स्वत:ला 'दिलजीत गर्ल फॉरेव्हर' म्हटल्यानंतर सोशल मीडियाात चर्चेला उधाण - KAREENA KAPOOR AND DILJIT DOSANJH
  3. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट जॅकी भगनानीच्या घराबाहेर नवीन कारसह झाले स्पॉट, व्हिडिओ व्हायरल - Ranbir Kapoor and Alia Bhatt

ABOUT THE AUTHOR

...view details