महाराष्ट्र

maharashtra

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 4, 2024, 5:07 PM IST

ETV Bharat / entertainment

'नैनो में सपना' गाण्यावर शिल्पा शेट्टीचा भन्नाट डान्स, पाहा व्हिडिओ - Shilpa Shetty Kundra Latest Video

Shilpa Shetty Kundra Latest Video : शिल्पा शेट्टीनं सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती सुंदर डान्स करताना दिसत आहे.

Shilpa Shetty Kundra Latest Video
शिल्पा शेट्टी कुंद्रा लेटेस्ट डान्स व्हिडिओ

मुंबई - Shilpa Shetty Kundra Latest Video : शिल्पा शेट्टी अशी एक बी-टाऊन अभिनेत्री आहे, जी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती फक्त चित्रपटांद्वारे तिच्या चाहत्यांचे मनोरंजन करत नाही तर, मजेदार व्हिडिओद्वारे सोशल मीडियावर शेअर करून देखील चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसते. आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ती शमिता शेट्टी आणि आकांक्षा मल्होत्रा अग्रवालबरोबर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तिघांनीही पांढरा टी-शर्ट आणि निळा डेनिम परिधान केली आहे. हा व्हिडिओ शिल्पाच्या चाहत्यांना खूप आवडत आहे.

शिल्पा शेट्टीनं शेअर केला सुंदर व्हिडिओ : 1983 मध्ये आलेल्या 'हिम्मतवाला' चित्रपटातील 'नैनो में सपना'वर डान्स करताना तिघीही सुंदर दिसत आहेत. एकेकाळी हिंदी चित्रपटसृष्टीत अपल्या नृत्याच्या अनोख्या शैलीमुळे 'जंपिंग जॅक' म्हणून गाजलेल्या अभिनेता जितेंद्रच्या 'हिम्मतवाला' चित्रपटातल्या गाण्यावर तिघींनी भन्नाट नृत्य केलंय. हा व्हिडिओ शेअर करताना शिल्पानं पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, ''एक हिम्मतवाला तोहफा आपके लिए.'' 'हिम्मतवाला' आणि 'तोहफा' ही दोन्ही जितेंद्रच्याच चित्रपटांची नावं. या व्हिडिओवर एका चाहत्यानं कमेंट करत लिहिलं, 'शिल्पा खूप सुंदर दिसत आहे, मला तुझा डान्स खूप सुंदर वाटला आहे.' दुसऱ्या एकानं लिहिलं, 'किती सुंदर व्हिडिओ आहे, आजचा दिवस माझा सुंदर जाणार.' आणखी एकानं लिहिलं, 'शिल्पानं खूप सुंदर गाणं निवडलं आहे, डान्स पण अप्रतिम केला आहे.' याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत आहेत.

शिल्पा शेट्टीचं वर्कफ्रंट : दरम्यान शिल्पा शेट्टी शेवटी रोहित शेट्टीच्या 'इंडियन पोलिस फोर्स' या वेब सीरिजमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा ​आणि विवेक ओबेरॉयबरोबर दिसली होती. या वेबसीरीजचा प्रीमियर यावर्षी जानेवारीमध्ये अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडिओ ( Amazon Prime Video) वर झाला होता. या तीन स्टार्सशिवाय या वेब सीरीजमध्ये निकितिन धीर, श्वेता तिवारी, शरद केळकर, ईशा तलवार आणि करणवीर मल्होत्रा या कलाकारांचाही समावेश होता. सात एपिसोडच्या या पोलीस ड्रामामध्ये तिघेही महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. रोहित शेट्टी, सुशांत प्रकाश आणि स्नेहा शेट्टी कोहली यांनी या वेब सीरीज सहदिग्दर्शन केलं होतं. आता पुढं ती 'केडी - द डेविल'मध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. आशिष विद्यार्थीनं घेतला डॉलीच्या टपरीवरील जगप्रसिद्ध चहाचा स्वाद, व्हिडिओ व्हायरल - Ashish Vidyarthi
  2. 'मी जिंवत असतपर्यत श्रीदेवीचा बायोपिक बनू देणार नाही', बोनी कपूरचा निर्धार - SRIDEVI BIOPIC
  3. 'मैदान' चित्रपटाला सेन्सॉरचा हिरवा कंदील, 'यूए' प्रमाणपत्रासह रिलीजचं मैदान मोकळं - maidaan Movie

ABOUT THE AUTHOR

...view details