मुंबई - Sharvari Wagh:अभिनेता शाहरुख खान, सलमान खान आणि हृतिक रोशन यांसारख्या दमदार अभिनेत्यांनंतर यशराज स्पाय युनिव्हर्सनं आता ॲक्शनच्या दुनियेत अभिनेत्रींना आणण्याचा निर्णय घेतला आहे. यशराज आपल्या बॅनरखाली आलिया भट्ट आणि शर्वरी वाघबरोबर 'अल्फा' हा पहिला फिमेल स्पाय ॲक्शन चित्रपट निर्मित करत आहे. आलिया आणि शर्वरीचा स्पाय ॲक्शन चित्रपट 'अल्फा'ची घोषणा आधीच करण्यात आली होती. दरम्यान नुकतीच आलिया भट्ट या चित्रपटाच्या शूटिंग सेटवर दिसली. 'अल्फा' चित्रपटात शर्वरी वाघ देखील दिसणार आहे. आज 30 जुलैपासून चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्यात आली आहे.
शर्वरी वाघ आणि आलिया भट्टचा चित्रपट : नुकतीच 100 कोटींची कमाई करणाऱ्या 'मुंज्या' चित्रपटातील शर्वरी वाघनं आज 30 जुलै रोजी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो 'अल्फा' चित्रपटाच्या शूटिंग सेटचा आहे. तिनं पोस्टमध्ये चित्रपटाचा निर्माता आदित्य चोप्रा आणि दिग्दर्शक शिव रवैल यांचं आभार मानले आहेत. ही पोस्ट शेअर करत शर्वरीनं लिहिलं की, "यापेक्षा मोठे काहीही असू शकत नाही, आजपासून माझा 'अल्फा' प्रवास सुरू करण्यासाठी मी खूप उत्साहित आहे, माझ्यावर विश्वास ठेवा, मी यासाठी खूप तयारी केली आहे. तुमच्या विश्वासाबद्दल आदित्य सर आणि शिव रवैल यांना खूप धन्यवाद!"