मुंबई - सलमान खान गेली काही दशकं बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीवर आधिराज्य गाजवत आला आहे. त्याच्या आगामी चित्रपटाइतकीच त्याच्या लग्नाबद्दलची उत्सुकताही चाहत्यांना कायम लागून राहिलेली असते. अनेक अभिनेत्रींशी त्याचं सूत जमूनही तो अद्यापही अविवाहित राहिला आहे. आता तो 59 वर्षाचा होऊनही त्याचं लग्न झालेलं नाही. तो लग्न का करत नाही किंवा त्यानं गर्लफ्रेंडस बनवूनही तो त्यांच्याशी लग्न का करु शकला नाही याचा खुलासा त्याचे वडील सलमान खान यांनी एका मुलाखतीत केला होता.
तर काही काळापूर्वी फिल्म समीक्षक कोमल नहाटा यांच्याशी झालेल्या मुलाखतीत सलीम खान यांना सलमानच्या लग्नाविषयी प्रश्न विचारला होता. त्यांच्या मुलाखतीची ही व्हिडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. यामध्ये सलीम खान म्हणतात, "सलमानचं काही कळत नाही काय आहे, सलमानची विचार करण्याची पध्दत थोडीशी विरोधाभासी असल्यामुळंही कदाचीत त्याचं लग्न जमत नसावं."
सलमान खान म्हणतात की, "सह-अभिनेत्रींशी झालेल्या सलगीमुळे किंवा त्यांच्या प्रेमात पडल्यामुळे म्हणा, सलमान त्यांच्याकडे आकर्षित होतो. त्या खूप उत्साही आणि देखण्या असतात. त्यांच्याबरोबर काम करताना संवाद होतो. ते क्लोज अॅटमॉसफियरमध्ये राहात असल्यामुळे त्यांच्यात सलगीचं नातं तयार होतं. यातल्या बहुतांशवेळा त्या अभिनेत्री त्याच्या नायिका असतात."
पुढं सलमान खान म्हणाले की, तो एखाद्या अभिनेत्रीच्या प्रेमात पडला की तो तिच्यामध्ये आईचे गुण शोधायला लागतो. त्या महत्वकांक्षी असलेल्या अभिनेत्री स्वतःच्या करियरला प्राधान्य देणाऱ्या असतात. त्यामुळं त्यांच्याकडं केवळ गृहिणी म्हणून पाहणं ही सलमानची चुक आहे. "लग्न करुन गृहिणी म्हणून राहावं असा विचार कोण कशाला करेल? त्याचं तसंच होतं," असं सलीम खान म्हणाले.
सलीम पुढं म्हणतात की, "जेव्हा दोघांच्यात कमिटमेंट होते तेव्हा तो तिला परावर्तीत करण्याचा प्रयत्न करतो, तिच्यात तो आपली आई शोधतो. ते तर शक्य नाही." मुलांसाठी उठून नाश्ता, जेवण बनवणं, त्यांना न्हाऊ घालून तयार करणं, शाळेत घेऊन जाणं, त्यांचा होमवर्क करुन घेणं, अशी कामं महत्त्वाकांक्षी असलेल्या अभिनेत्री का स्वीकारतील, असं सलीम यांना वाटतं.
कोमल नहाटा आणि सलीम खान यांच्या मुलाखतीची ही व्हिडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. सलमान खानच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचं तर त्याचा 'सिकंदर' हा चित्रपट 2025 च्या ईदला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं सध्या शूटिंग सुरू असून हा त्याच्या करियरसाठी खूप महत्त्वाचा चित्रपट असणार आहे. यामध्ये तो रश्मिका मंदान्नाबरोबर काम करत आहे.