मुंबई - Shaitaan Trailer out soon : अजय देवगण, आर. माधवन आणि ज्योतिका स्टारर थ्रिलर-सस्पेन्स चित्रपट 'शैतान' सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाचे अनेक पोस्टर्स आणि टीझर रिलीज झाल्यानंतर आता ट्रेलर रिलीज तारीख ही समोर आली आहे. 'शैतान'चा ट्रेलर 22 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं पोस्टर शेअर करताना अजयनं त्याच्या पोस्टवर लिहिलं होतं, ''8 मार्च 2024 रोजी 'शैतान' तुमच्यासाठी येत आहे. ट्रेलर उद्या रिलीज होईल.'' आता अजयच्या पोस्टवर अनेकजण कमेंट्स करून या चित्रपटाबद्दल प्रतीक्षा करत असल्याचं सांगत आहेत. हा काळ्या जादूवर आधारित सुपरनॅचरल थ्रिलर आहे.
'शैतान'चा ट्रेलर होणार प्रदर्शित : या चित्रपटात अजयबरोबर साऊथची दिग्गज अभिनेत्री ज्योतिका मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय आर. माधवन 'शैतान'मध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसेल. जिओ स्टुडिओ, अजय देवगन फिल्म्स आणि पॅनोरमा स्टुडिओ इंटरनॅशनल प्रस्तुत, 'शैतान'ची निर्मिती अजय देवगण, ज्योती देशपांडे, कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक यांनी केली आहेत. आता नुकतेच 'शैतान'मधील आर. माधवनचं पोस्टर रिलीज झालं होतं. हे पोस्टर खूप थरारक होतं. या चित्रपटाचं दिग्दर्शन विकास बहल यांनी केलंय. यापूर्वी 25 जानेवारी 2024 रोजी 'शैतान' चित्रपटाचा टीझर रीलीज झाला होता. 'शैतान'च्या टीझरमध्ये आर. माधवन भीतीबद्दल सांगताना दिसला होता. 'शैतान'चा हा टीझर अनेकांना आवडला होता.