मुंबई - Shahid Kapoor : शाहिद कपूर सध्या त्याच्या सायन्स-फिक्शन रोमँटिक कॉमेडी चित्रपट 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया'मुळे चर्चेत आहे. हा चित्रपट उद्या 9 फेब्रुवारीला रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये शाहिदबरोबर अभिनेत्री क्रिती सेनॉन दिसणार आहे. 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' चित्रपटातून पहिल्यांदाचं शाहिद आणि क्रिती रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. शाहिद कपूर त्याच्या आगामी चित्रपटाच्या रिलीजपूर्वी इंस्टाग्रामवर विनोदी रील पोस्ट करून चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. त्याचा हा रील क्रिकेटर विराट कोहलीशी संबंधित आहे.
शाहिद कपूरनं शेअर केला मजेदार व्हिडिओ :शाहिद कपूरनं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो क्रिकेटच्या बॅटसह घरात इकडे-तिकडे फिरताना दिसतो. याशिवाय विराट कोहलीनं फिटनेसवर दिलेल्या मुलाखतीला शाहिद लिप सिंक करत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलं, ''प्रमोशन संपल्यानंतरच्या भावना.'' शाहिद कपूरचा हा मजेदार व्हिडिओ अनेकांना खूप आवडत आहे. अनेकजण या व्हिडिओवर कमेंट करून त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. काहीजण या व्हिडिओच्या कमेंट विभागात फायर इमोजी आणि हसण्याचे इमोजी पोस्ट करत आहेत. यापूर्वी देखील शाहिदनं एक मजेशीर रील इंस्टाग्रामवर शेअर केला होता. त्याचा हा रील वाढत्या वजनबद्दल होता. सोशल मीडियावर त्याचा हा रील देखील खूप व्हायरल झाला होता.