महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'केकेआर'च्या विजयानंतर शाहरुख खानचं कुटुंब झालं भावूक, बाप लेकीच्या डोळ्यात आनंदाश्रू - IPL 2024 Final - IPL 2024 FINAL

KKR vs SRH: शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खान आयपीलएल 2024 च्या फायनल सामन्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या विजयानंतर भावूक होताना दिसली. सुहाना खानचे तिच्या वडिलांबरोबरचे भावनिक क्षण कॅमेऱ्यात कैद झाले.

KKR vs SRH
'केकेआर'च्या विजयानंतर शाहरुख खानचं कुटुंब झालं भावूक ((IANS))

By ETV Bharat Marathi Team

Published : May 27, 2024, 9:52 AM IST

मुंबई - KKR vs SRH: कोलकाता नाइट रायडर्स (KKR) ने IPL 2024 च्या अंतिम सामन्यामध्ये सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध 8 गडी राखून शानदार विजय मिळवला. यासह केकेआरनं तिसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकून विजय साजरा केला. सामना जिंकल्यानंतर शाहरुखच्या आनंदाला पारावार उरला नाही आणि त्याने स्टँडवर आनंदाने उडी मारली. त्यांनी पत्नी गौरी खान आणि संघातील सदस्यांना मिठी मारून संघाच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला. या सेलिब्रेशन दरम्यान शाहरुख खान आणि त्याची मुलगी सुहाना आणि पत्नी गौरी खान इमोशनल झालेले दिसले. त्यांचा हा भावनिक क्षण पाहून इंटरनेटवर लोकांची मनं जिंकली आहेत.

कोलकाता नाइट रायडर्सचे खेळाडू, समर्थक आणि प्रेक्षक यांनी विजयानंतर जल्लोष साजरा केला. यामध्ये शाहरुख खान आणि त्याच्या कुटुंबाचे अनेक खास क्षण टिपण्यात आले आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये भावूक झालेली सुहाना आनंदाश्रूंनी तिच्या वडिलांना मिठी मारते. त्यानंतर छोटा अबरामही शाहरुखच्या जवळ येऊन मिठी मारतो. त्यापाठोपाठ आर्यन खानही सामील होतो. हा प्रसंग कॅमेऱ्यांनी कैद केला आणि आता हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

एका व्हिडिओमध्ये शाहरुख पत्नी गौरी खानला आनंदाने मिठी मारताना आणि चुंबन घेताना दिसत आहे. यादरम्यान किंग खानही गौतम गंभीरवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसला. केकेआरच्या यशात योगदान दिल्याबद्दल शाहरुखनं मिचेल स्टार्कचंही कौतुक केलं.

कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील आयपीलचा अंतिम सामना पाहण्यासाठी बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान त्याच्या कुटुंबासह चेन्नईला आला होता. त्यांच्याशिवाय, सुहाना खानची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री अनन्या पांडे आणि शनाया कपूर देखील सामना पाहण्यासाठी एमए चिदंबरम स्टेडियमवर पोहोचल्या, तर अभिनेत्री आणि केकेआरची सहमालक जुही चावला देखील आयपीएल फायनलसाठी मैदानावर उपस्थित होती.

अहमदाबादमध्ये झालेल्या सामन्यादरम्यान शाहरुख खानची प्रकृती खालावली होती. उष्माघातामुळे त्याला अहमदाबादच्या केडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर तो मैदानावर परतणार की नाही याबद्दल शंका व्यक्त होती. मात्र अंतिम सामन्यात केकेआर संघाचं मनोबल वाढवण्यासाठी तो खास उपस्थित राहिला आणि मिळालेल्या घवघवीत यशानं आनंदून गेला.

हेही वाचा -

  1. आमिरचा मुलगा ओटीटी पदार्पणासाठी सज्ज, जाणून घ्या जुनेद खानचा 'महाराजा' कधी आणि कुठे होणार रिलीज - Junaid Khan OTT debut
  2. कार्तिक आर्यन आणि करण जोहरचा 'दोस्ताना 2' का बंद झाला, आता समोर आलं खरं कारण - Dostana 2
  3. प्रथमेश परब आणि अंकिता लांडे जोडीच्या 'होय महाराजा' ट्रेलरला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद! - Hoy Maharaja

ABOUT THE AUTHOR

...view details