मुंबई - अभिनेता आणि साईचा भक्त असलेल्या सोनू सूदनं नववर्षाच्या निमित्तानं आज सहपत्नीक शिर्डीत दाखल झाला. तो आगामी 'फतेह' या चित्रपटातून दिग्दर्शनक्षेत्रात पदार्पण करणार आहे. या चित्रपटाची कथाही त्यानं लिहिली आहे. त्यात सोनू मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 10 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. त्या आधी साईचा आशीर्वाद घेण्यासाठी सोनू सूदने आपल्या पत्नीसह साई दरबारी हजेरी लावत, साईंच्या दुपारच्या अर्थात मध्यान्ह आरतीला हजेरी लावली.
'फतेह' चित्रपटाला यश मिळो, हीच प्रार्थना साईचरणी केली असल्याचं सांगत या चित्रपटात सायबर फसवणूक झालेल्यांची कहाणी दाखवण्यात आली असल्याची माहिती त्याने दिली. शिर्डीतील ही फसवणूक झाल्याचा कथानकात समावेश करण्यात आला असल्याचं त्यानं सांगितलंय. साईभक्त असलेला सोनू गरीबांचा 'मसीहा' म्हणून ही ओळखला जातो. माझ्या आगामी चित्रपटाच्या कमाईतील हिस्सा गोरगरिबांच्या कल्याणासाठी तसंच वृध्दाश्रम आणि मुलांच्या कल्याणसाठी वापरला जाणार असल्याचं सोनूनं म्हटलंय.
साईबाबांचा आशीर्वाद घेवून चित्रपटाचा रंगीन दुनियेत पदार्पण केलं होतं. आता पहिल्यांदाच तो स्वतःच्या 'फतेह' या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार असून मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाला चांगलं यश मिळावं यासाठी आज साईबाबांच्या दर्शनासाठी आलो असल्याचही सोनूनं यावेळी सांगितलं. यावेळी साईबाबा संस्थानच्या वतीनं शॉल साई मूर्ती देवून सोनूचा सहपत्नीक सत्कार करण्यात आला.
सूदच्या 'फतेह' या चित्रपटाचा ट्रेलर अलीकडेच रिलीज झाला. यातील त्याचा आक्रमक अंदाज पाहून 'अॅनिमल' आणि 'पुष्पा'तील वेगवान अॅक्शनची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. सामान्य माणसांचे अश्रू पुसण्यासाठी नेहमी आघाडीवर राहणारा सोनू सूद पडद्यावरही सामान्य लोकांसाठी एक मोठी लढाई लढताना या सिनेमात दिसणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.
'फतेह' चित्रपटात सोनू सूदबरोबर जॅकलीन फर्नांडिस, नसीरुद्दीन शाह, विजय राज, शिव ज्योती राजपूत, दिव्येंदू भट्टाचार्य, प्रकाश बेलवाडी, बिन्नू ढिल्लोन यासारखे कलाकार आहेत. या चित्रपटातून सोनू सूद लेखन आणि दिग्दर्शनात हात आजमावणार आहे. हा त्याचा पहिलाच दिग्दर्शकीय चित्रपट आहे. या चित्रपटाची निर्मिती सोनाली सूद आणि सोनू सूद यांनी केली असून हा चित्रपट 10 जानेवारी 2025 रोजी रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे.
हेही वाचा -