मुंबई- Thalaiyava 171 : साऊथचा सुपरस्टार रजनीकांत सध्या त्याच्या आगामी 'थलैयवा 171' आणि 'वेट्टीयान' या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. आता रजनीकांतच्या 'थलैयवा 171' आणि बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्नुसार शाहरुख खान रजनीकांतच्या चित्रपटात दिसणार आहे. यापूर्वी शाहरुख आणि रजनीकांत रा-वन चित्रपटात एकत्र दिसले होते. रा-वनमध्ये रजनीकांतचा कॅमिओ होता आणि आता शाहरुख खान 'थलैयवा 171' मध्ये कॅमिओ करणार असल्याचं म्हटलं जात आहे.
विक्रम आणि लिओ चित्रपटातून धमाका केल्यानंतर लोकेश कनागराज आता रजनीकांत बरोबर पहिल्यांदाच चित्रपट बनवणार आहे. आता या चित्रपटात शाहरुख खान कॅमिओ करताना दिसणार असल्याचे बोलले जात आहे. असे झाले तर रजनीकांत, शाहरुख खान आणि लोकेश कनगराज हे त्रिकूट बॉक्स ऑफिसवर खळबळ माजवू शकते. मात्र, याबाबत निर्मात्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
'थलैयवा 171' खलनायक कोण?
दुसरीकडे, रजनीकांत यांच्या चित्रपटासाठी चांगल्या खलनायकाचा शोध सुरू आहे. या चित्रपटासाठी अभिनेता माईक मोहनचे नाव पुढे येत आहे. मात्र, निर्मात्यांनी अद्याप त्याचंही नावे जाहीर केलेलं नाही. या चित्रपटात रणवीर सिंग आणि साऊथचा डॅशिंग खलनायक विजय सेतुपती यांचीही नावे समोर आली आहेत. 22 एप्रिल रोजी चित्रपटाच्या शीर्षकाची घोषणा होणार आहे. चाहते त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.