महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

मन्नत सोडून शाहरुख खान कुटुंबासह भाड्याच्या घरात राहायला जाणार, वाचा सविस्तर - SHAH RUKH KHAN

शाहरुख खान त्याच्या कुटुंबासह त्याचे घर मन्नत सोडून भाड्याच्या घरात राहायला जात आहे. आता या मागील कारण जाणून घ्या...

shah rukh khan
शाहरुख खान (शाहरुख कुटुंबासह भाड्याच्या घरात राहायला जाईल. (IANS))

By ETV Bharat Entertainment Team

Published : Feb 26, 2025, 5:20 PM IST

मुंबई :बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान त्याच्या आलिशान घरात मन्नतमध्ये राहतो. आता रिपोर्ट्सनुसार, 'किंग खान' मन्नत सोडून भाड्याच्या घरात आपल्या कुटुंबासह राहायला जाणार आहे. पण शाहरुखला त्याचे घर सोडून भाड्यानं राहण्याची गरज का पडली? आता याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

शाहरुख भाड्याच्या घरात राहण्यासाठी जाईल : रिपोर्ट्सनुसार, शाहरुखनं बॉलिवूडच्या भगनानी कुटुंबाकडून मुंबईतील पाली हिल्समध्ये दोन हाय-एंड डुप्लेक्स अपार्टमेंट भाड्यानं घेतले आहेत. यातील एक अपार्टमेंट बिल्डर जॅकी भगनानी यांचे आहे. तर दुसरे अपार्टमेंट त्यांची बहीण दीपशिखा देशमुख यांचे आहे. शाहरुख मन्नतमधून बाहेर पडत आहे, कारण तिथे रेनोवेशनचे काम सुरू आहे. यासाठी शाहरुखला न्यायालयाची परवानगी घ्यावी लागली होती, कारण मन्नत ही ग्रेड III हेरिटेजची रचना आहे. मन्नतमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यासाठी परवानगी घ्यावी लागते.

शाहरुख अपार्टमेंटचे भाडे किती आहे? : दोन्ही अपार्टमेंटचे मासिक भाडे 24.15 लाख रुपये आहे. हे डुप्लेक्स पाली हिलमधील पूजा कासा इमारतीत आहेत. नोव्हेंबर 2024 मध्ये, गौरी खाननं मन्नतचा काही भाग वाढवण्यासाठी महाराष्ट्र किनारपट्टीचा विस्तार करण्यासाठी, महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाकडे मंजुरी मागितली होती. यामध्ये मन्नतच्या मागे असलेल्या सहा मजली अ‍ॅनेक्समध्ये दोन मजले जोडण्याची मागणी करण्यात आली होती. संपूर्ण प्रकल्पाचा खर्च 25 कोटी रुपये आहे. मन्नतच्या रेनोवेशन करणासाठी किती वेळ लागेल हे अद्याप निश्चित झालेले नाही, मात्र एका बातमीनुसार शाहरुखला किमान 2 वर्षे भाड्याच्या घरात राहावे लागेल.

मन्नत हे नाव कसे पडले? :मन्नतच्या आधी ही मालमत्ता व्हिला व्हिएन्ना म्हणून ओळखली जात असे. बँडस्टँड येथे 'येस बॉस' चित्रपटामधील एका दृश्याचे शूट करताना शाहरुख खाननं नरीमन दुबाश यांनी बांधलेल्या हेरिटेज बंगल्याचे कौतुक केले. यानंतर त्यानं 2001 मध्ये ही मालमत्ता घेतली होती, मात्र ती ग्रेड III हेरिटेजची रचना असल्यान त्याला त्यात कोणतेही बदल करण्याची परवानगी नव्हती. यानंतर, शाहरुखनं त्याच्या मागे सहा मजली अ‍ॅनेक्स बांधले जे मन्नत अ‍ॅनेक्स म्हणून ओळखले जाते. 'किंग खान' गेल्या 25 वर्षांपासून या घरात राहत आहे. तसेच मिळालेल्या माहितीनुसार शाहरुखनं त्याचे नवीन अपार्टमेंट तीन वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेतले आहेत. 'किंग खान'च्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो शेवटी राजकुमार हिरानीच्या 'डंकी' चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याच्याबरोबर विकी कौशल आणि तापसी पन्नूसारखे कलाकार होते. हा चित्रपट 2023 रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला होता. तसेच शाहरुखनं यापूर्वी 'पठाण 'आणि 'जवान' यासारखे ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कमाईचे अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. आता त्याचा आगामी चित्रपट 'किंग' आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर त्याची मुलगी सुहाना खान देखील असणार आहे.

हेही वाचा :

  1. 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या लॉन्च इव्हेंटमध्ये शाहरुख खान झाला भावुक झाला, चाहत्यांना केली 'ही' विनंती...
  2. शाहरुख खान स्टारर 'किंग' चित्रपटाचा दिग्दर्शक कोण असेल ? झाला खुलासा...
  3. शाहरुख खानपासून संजय दत्तपर्यंत बॉलिवूड स्टार आहेत सलमान खानच्या होस्टिंगचे फॅन

ABOUT THE AUTHOR

...view details