मुंबई - Indian 2 Pre Release Event : साऊथ सुपरस्टार कमल हासन अभिनीत मोस्ट अवेटेड चित्रपट 'इंडियन 2' रिलीज होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. हा चित्रपट खूप दिवसांपासून चर्चेत आहे. कमल हासन आणि चित्रपटाचे दिग्दर्शक एस. शंकर यांनी 'इंडियन' चित्रपटाचा सीक्वेल 28 वर्षानंतर बनवला आहे. आता कमल हासनचे चाहते 'इंडियन 2' या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. 'इंडियन 2' 12 जुलै रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. याआधी, चित्रपटाचा एक प्री-रिलीज इव्हेंट असेल, याबद्दलची माहिती आता समोर आली आहे. इंडियन 2 चे निर्माते, लाइका प्रोडक्शननं आज 6 जुलै रोजी 'इंडियन 2 'च्या प्री-रिलीज इव्हेंटबद्दल माहिती शेअर केली आहे.
प्री-रिलीज 'इंडियन 2' चित्रपट :प्री-रिलीज कार्यक्रम 7 जुलै रोजी संध्याकाळी 6 वाजता एन कन्व्हेन्शन सेंटर, हैदराबाद येथे होणार आहे. ही पोस्ट शेअर करत लाइका प्रॉडक्शननं लिहिलं आहे की, "नुकताच 'इंडियन 2'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. यामध्ये कमल हासन भ्रष्टाचार संपवताना वेगवेगळ्या अवतारात दिसत आहेत. 'इंडियन 2' चित्रपटाची कहाणी देशात चालत असणाऱ्या भ्रष्टाचारावर आहे. एस. शंकरचे जवळपास सर्वच चित्रपट राजकीय भ्रष्टाचार, खराब सरकारी व्यवस्था आणि नागरी जबाबदारी यावर आधारित असतात. आता 'इंडियन 2' चित्रपटाला प्रेक्षक किती प्रेम देणार हे पाहाणे लक्षणीय असणार आहे.