मुंबई - SONAKSHI ZAHEER WEDDING RECEPTION : सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाची संपूर्ण मनोरंजन जगतात भरपूर चर्चा सुरू आहे. लग्नानंतर झालेल्या रिसेप्शनला अनेक बॉलिवूड स्टार्सनी उपस्थित राहून नवविवाहितांचे अभिनंदन केलं. यासाठी सुपरस्टार सलमान खान उपस्थित होता.
लग्नाच्या रिसेप्शनमध्ये सोनाक्षीनं लाल रंगाची सिल्क साडी नेसली होती. तिनं चोकर-शैलीतील हिरवा आणि सोन्याचा नेकलेस, मॅचिंग ड्रॉप इअरिंग्ज आणि लाल बांगड्या घातल्या होत्या. तिनं आपल्या बांधलेल्या केसांमध्ये चमेलीचा गजरा माळला होता. सोनाक्षीचा पती जहीर पांढऱ्या रंगाच्या शेरवानीमध्ये देखणा दिसत होता.
सलमान खानची 'दबंग' स्टाईलमध्ये एन्ट्री
'दबंग' गर्ल सोनाक्षीच्या लग्नाच्या रिसेप्शनला अभिनेता सलमान खानची हजेरी सर्वांचं लक्ष वेधून घेणारी होती. 'दबंग'मध्ये एकत्र काम केलेल्या सलमानानं सोनाक्षी आणि जहीरच्या लग्नाला हजेरी लावली नसती तरच नवल. सलमानला मिळत असलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर तो सहसा सार्वजिनक कार्यक्रमांना कमी उपस्थित राहतो. त्यामुळे तो या रिसेप्शनला येईल की, नाही अशी शंका व्यक्त केली जात होती. मात्र त्यानं आपल्या 'दबंग' स्टाईलनं हजेरी लावून सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांना शुभेच्छा दिल्या.
रिसेप्शनमध्ये अवतरली बॉलिवूडचे तारांगण
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालच्या रिसेप्शन पार्टीमध्ये तारे तारकांची मांदियाळी पाहायला मिळाली. या कार्यक्रमाला अभिनेत्री विद्या बालनने पती सिद्धार्थ रॉय कपूरसोबत हजेरी लावली होती. चित्रपट दिग्दर्शक सुभाष घई हेही आपल्या पत्नीसह कार्यक्रमाला पोहोचले होते. या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो देखील दिसल्या. त्यांनी हिरव्या रंगाच्या सलवार कमीजमध्ये पापाराझींसाठी पोज दिली. नवविवाहित जोडप्याचे अभिनंदन करण्यासाठी आलेली अभिनेत्री रवीना टंडन सुंदर दिसत होती. या कार्यक्रमात डेझी शाह आणि संगीता बिजलानी देखील दिसल्या होत्या. लग्नाच्या रिसेप्शनमध्ये सहभागी होण्यासाठी आदित्य रॉय कपूर पोहोचला होता. रिचा चढ्ढा आणि अली फजल या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी ज्येष्ठ अभिनेत्री रेखा पोहोचल्या. चित्रपट दिग्दर्शक रमेश सिप्पी आणि फरदीन खान हे पाहुण्यांमध्ये दिसले.
या कार्यक्रमात अरबाज खान देखील दिसला. अभिनेता अनिल कपूर रेड कार्पेटवर शोभून दिसत होता. अभिनेत्री काजोलनं अनेक रंगांच्या ब्लाउजसह काळी आणि सोनेरी साडी नेसून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. हुमा कुरेशीने या प्रसंगासाठी ट्रेंडी कटआउट ब्लाउजसह सुंदर बेज साडी नेसली होती. तिचा भाऊ अभिनेता साकिब सलीम हा विवाहित जोडप्याचा जवळचा मित्र आहे, कोही हुमा बोरबर आला होता. तर चंकी पांडेने पांढऱ्या शर्टसोबत निळ्या रंगाचे जॅकेट घातले होते. अनिल कपूर आणि चंकी पांडे यांनी आनंदाने कॅमेऱ्यासाठी पोझ दिली.