मुंबई Salman Khan :अभिनेता सलमान खान अलीकडेच दुबई मॉलमध्ये स्पॉट झाला. यावेळी तो त्याच्या हाय सिक्योरिटीसह फिरताना दिसला. मॉलमध्ये आधीच एक कार्यक्रम सुरू असला तरी, तिथे उपस्थित असलेले लोक सलमान खानची एक झलक पाहण्यासाठी आतुर असल्याचे दिसले. सुरक्षा असताना देखील चाहत्यांनी 'भाईजान'ला चारही बाजूंनी घेरलं होतं. यानंतर सलमानला सुरक्षित ठेवण्यासाठी सिक्योरिटी गार्डला पुढं यावं लागलं. सलमान दुबई मॉलमध्ये निळ्या रंगाचा शर्ट, बॅगी पॅन्ट आणि सनग्लासेस घालून होता. यात तो खूपच स्टायलिश दिसत होता. त्याचा बॉडीगार्ड शेरा त्याच्याबरोबर होता.
सलमान खानच्या वडिलांना धमकी : सलमानचे वडील सलीम खान यांना गुरुवारी, 19 सप्टेंबर रोजी मॉर्निंग वॉक दरम्यान धमकी मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा सलीम खान सलमान खानबरोबर वांद्रे येथील घराजवळ मॉर्निंग वॉकसाठी निघाले, तेव्हा स्कूटरवर स्वार असलेला व्यक्ती आणि बुरखा घातलेली एक महिला त्याच्याजवळ आले. यानंतर त्यांनी तुरुंगात बंद असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचं नाव घेऊन सलीम खान यांना धमकावलं. यावेळी त्या महिलेनं म्हटलं, "लॉरेन्स बिष्णोई को भेजू क्या." या धमकीनंतर मुंबई पोलीस सतर्क झाली असून बुरखा घातलेल्या महिलेचा आणि पुरुषाचा शोध सुरू करण्यात आला आहे.