मुंबई : अभिनेता सलमान खानला त्याची आई सलमा खूप जास्त आवडते. जेव्हाही कौटुंबिक कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ बाहेर येतात, तेव्हा सलमान त्याच्या आईबरोबर दिसत असतो. सलमाननं त्याच्या आईच्या वाढदिवशीही खास पोस्ट शेअर करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. सलमानची आई सलमा खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये त्यांचा तोल हा जाताना दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगानं व्हायरल होत आहे. सलमनानचे अनेक चाहते, त्याच्या आईविषयी आता चिंतेत असल्याचे दिसत आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
सलमानच्या आईचा गेला तोल : व्हिडिओत सलमा खान या कुठेतरी बाहेर आहे आणि त्या त्यांच्या गाडीच्या दिशेन जाताना दिसत आहे. यानंतर त्यांचा अचानक तोल जातो आणि त्यांना एक मागे असलेली महिला पकडते. गाडीपर्यंत जाताना त्यांना अनेक लोकांची गरज पडली. सलमा खानच्या या व्हिडिओवर एका यूजरनं लिहिलं, 'तुम्ही तुमच्याबरोबर व्हीलचेअर का आणली नाही?' दुसऱ्या एकानं लिहिलं, 'सर्वांच्या प्रार्थना तुमच्यासोबत आहेत.' आणखी एकानं लिहिलं, 'संपूर्ण बॉलिवूडची आई आहे.' याशिवाय अनेकजण या व्हिडिओवर हार्ट इमोजी शेअर करत आहेत. दरम्यान सलमान अनेकदा आपल्या आईबरोबर फोटो शेअर करत असतो.