महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

एआर मुरुगदास दिग्दर्शित 'सिकंदर'साठी सलमान खाननं 2025 ईदची रिलीज डेट केली लॉक - Salman Khan and Sikandar Movie - SALMAN KHAN AND SIKANDAR MOVIE

Salman Khan Action Movie : 'गजनी'च्या दिग्दर्शकानं सलमान खानबरोबरच्या आपल्या आगामी चित्रपटाचं नाव जाहीर केलं आहे. याशिवाय हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार हेही सांगितलं आहे.

Salman Khan Action Movie
सलमान खानचा ॲक्शन चित्रपट

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 11, 2024, 1:40 PM IST

मुंबई - Salman Khan Action Movie :आज ईद आहे आणि 'भाईजान' सलमान खाननं त्याच्या चाहत्यांना आता ईदी दिली आहे. आजच्या या विशेष प्रसंगी सलमान खाननं त्याच्या आगामी चित्रपटाच्या नावाची घोषणा केली आहे. त्याचा हा चित्रपट साजिद नाडियादवाला निर्मित करणार आहे. याशिवाय या चित्रपटाचं दिग्दर्शन गजनीचे दिग्दर्शक एआर मुरुगदास करत आहेत. आता ईदच्या मुहूर्तावर भाईजाननं त्यांच्या चाहत्याला खुश केलं आहे. सलमान खाननं इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं, "या ईदवर 'बडे मियाँ छोटे मियाँ आणि 'मैदान', पुढच्या ईदला 'सिकंदर'ला भेटा, सर्वांना ईदच्या शुभेच्छा.''

सलमान खाननं दिलं चाहत्यांना गिफ्ट : मिळालेल्या माहितीनुसार, 'सिकंदर' ॲक्शन चित्रपट असणार आहे. निर्माता साजिद नाडियादवालानं सलमान खानबरोबर 'सिकंदर' चित्रपटापूर्वीही काम केलं आहे. या जोडीनं 'जुडवा', 'मुझसे शादी करोगी',' किक' असे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. दरम्यान अलीकडेच एका मुलाखतीत एआर मुरुगदास यांनी सलमान खानच्या या बहुप्रतीक्षित चित्रपटाबद्दल सांगितलं होतं. त्यांनी मुलाखतीत म्हटलं होतं की, "माझ्या आगामी चित्रपटात हाय-ऑक्टेन ॲक्शन सीन्स तसंच भावना आणि एक मोठा सामाजिक संदेश असेल. हा एक पॅन इंडिया चित्रपट आहे, प्रेक्षकांना या चित्रपटात सलमान खानचा वेगळा अवतार पाहायला मिळेल."

सलमान खानच्या 'सिकंदर'चे शूटिंग :पुढं त्यांनी म्हटलं होतं "सलमान आणि मी पाच वर्षांपूर्वी या प्रोजेक्टवर चर्चा केली होती, पण काही गोष्टींमुळे आम्ही हा प्रोजेक्ट पुढे नेऊ शकलो नाही, अलीकडेच त्यानं मला एका नवीन कहाणीबद्दल विचारत म्हटलं होत की, माझी स्क्रिप्ट त्याला हिंदी चित्रपटसृष्टीत एक नवीन ओळख आणि सुंदर वातावरण निर्माण करून देईल.'' या चित्रपटाचं शूटिंग पोर्तुगाल आणि युरोपातील अनेक देशांमध्ये होणार आहे. त्याचबरोबर चित्रपटाचा काही भाग भारतातही शूट केला जाणार आहे. सलमानला बऱ्याच दिवसांपासून सुपरहिट चित्रपट मिळालेला नाही. तो शेवटी 'टायगर 3'मध्ये दिसला होता. या चित्रपटाला रुपेरी पडद्यावर फारसा प्रतिसाद मिळाला नाही. याशिवाय सलमान पुढं सिकंदर व्यतिरिक्त, 'किक 2' आणि 'टाइगर वर्सेस पठान' चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. कार्तिक आर्यन प्रेमात पडायला तयार, नेहा धुपियाला दिली मोठी जबाबदारी - kartik ready for love relationship
  2. 'बिग बॉस 17' चा विजेता मुनव्वर फारुकीवर फेकली अंडी; पोलिसांनी आरोपीला बजावली नोटीस - Munawar Faruqui
  3. हावडा ब्रिजवर 'रूह बाबा'च्या अवतारात दिसला कार्तिक आर्यन - kartik aryan shares picture

ABOUT THE AUTHOR

...view details